Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १७, २०२२

बारूद गोळा खाल्ल्यामुळे तोंडात स्फोट

बारूदगोळा मुळे दोन जनावरे जखमी

निलज परिसरात बारूद गोळ्याची दहशत




ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज येथे चराईसाठी गेलेल्या जनावरांचा डुकरांच्या शिकारीसाठी ठेवलेला बारूद गोळा खाल्ल्यामुळे तोंडात स्फोट झाल्याने दोन दिवसात दोन जनावरे जखमी झाली आहेत. निलज परिसरात बारुद गोळ्याची दहशत निर्माण झाली आहे .

आरमोरी तालुक्यातील अज्ञात शिकार्‍यांनी रानडुकरांच्या शिकारी करिता निलज परिसरामध्ये बारूद गोळा पेरलेला आहे निलज येथील नागरिकांनी आपली जनावरे चराईसाठी नेले असता काल दिनांक 15 फेब्रुवारीला संतदास नखाते यांचा बैल व आज दिनांक 16 फेब्रुवारीला जनार्धन ठाकरे यांच्या गाईने बारूद गोळ्या खाल्ल्याने त्या बारूद गोळ्याचा तोंडात स्फोट होऊन दोन्ही जनावरांच्या तोंडाला मोठी जखम निर्माण झाली आहे. ही जनावरे दगावण्याची दाट शक्यता आहे . 

सदर प्रकाराची माहिती वन विभाग व पोलिस विभाग यांना कळविण्यात आली घटनास्थळी वनविभाग व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आज दिनांक 16 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास बारुद गोळा पेरून ठेवलेल्या ठिकाणी शिकारी आले असता शिकाऱ्यांना पकडण्यात येत असल्याची माहिती होताच शिकारी यांनी सदर ठिकाणी दुचाकी सोडून पळ काढला घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकी जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शिकार्‍यांनी पेरून ठेवलेल्या बारूद गोळ्या मुळे रोज घटना घडत असल्याने निलज परिसरात दहशत निर्माण झाली आहे. 


Explosion in the mouth due to eating ammunition
Chandrapur Maharashtra India Brahmapuri

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.