संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२३ फेब्रुवारी:-
जीवनात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता, त्यावर मात केली पाहिजे. जीवनामध्ये यश मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी केले.
ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ वी जयंती सशस्त्र दुरक्षेत्र धाबे पवनी च्या वतीने एम. पी. डी. विद्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
शिवजयंती निमित्ताने विद्यार्थी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्यात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर हे होते. यावेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक दाते,संदाने या वेळी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्यात.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांनी हिरीरीने भाग घेतला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक दिनेश डोंगरवार तर द्वितीय पुर्तीका शेंडे, निबंध स्पर्धा प्रथम राणी काटेंगे, सोनाली करपते हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पाचशे मीटर धावणे, शस्त्र खोलने व जोडणे, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी स्पर्धा शिवजयंती निमित्त घेण्यात आल्यात. विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिया, अप्पर पोलीस अधीक्षक देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन नवेगावबांध यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलीस अमलदार, आयआरबी गट क्रमांक १५ अमलदार, एमपीडी विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.