Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

हवेत झेप घेणाऱ्या "त्या" हरणाच्या व्हायरल व्हिडीओची सत्यकथा



तहानेने व्याकुळ होऊन पाण्याच्या शोधात निघालेले एक हरण तलावातील पाणी पिऊन पुढे निघाले होते. इतक्यात एका कुत्र्याने पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी ती सैरावैर पळत सुटली. कुत्रा झडप घेणार इतक्यात हरणाने तलावाच्या पाळीवरून झेप घेतली. ही नुसती झेप नव्हती तर हवेतून एखादा पक्षी उडवा, असे दृष्य होते....

हा रोमांचकारी व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद झाला. तो फेसबुकवर पोस्ट झाला. अनेकांनी तो डाऊनलोड करून व्हॉटस् एपवर शेअर केला. व्हिडीओतील थरार बघून अनेकांना तो आपल्याच गावाच्या तलावावरचा असल्याचा भास होऊ लागला. इतकेच काय तर वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी बातम्याही केल्या. पण, व्हिडिओ नेमका कुठला हे कुणीही शोधले नाही.

या व्हिडिओची सत्य कथा जाणून घेण्यासाठी खबरबात ने प्रयत्न केला आणि हवेत झेप घेणाऱ्या त्या हरणाच्या व्हायरल व्हिडीओची सत्यकथा शोधली.


हा हरणीचा विडीओ भागीमहारी पर्यटनस्थळ येथील तलावावरील आहे. भागीमहारी हे गाव नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी चोहीदिशेने हिरवळ असलेले भागीमहारी म्हणजे वन्यप्राण्यांसाठी हक्काचे ठिकाण. येथे दर शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येत असतात. येथील जंगलात जवळपास 300 च्या जवळपास हरण, सांबर, चिकारा, निलगाय आहे. येथे येणारे पर्यटक पार्टी करण्याचा बेताने इथे येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे गावातील बरीचशी कुत्रे या परिसरात असतात.




३० डिसेंबर २०२१ची चा दिवस. भागीमहारी येथील काही तरुण फिरायला आली होती. त्याच वेळी या परिसरातील हरिण तलावावर पाणी प्यायला आली. गावातीलच कुत्र्यांनी तिचा पाठलाग केला. त्यावेळी आपला जिव वाचविण्याकरीता हरिणीने भागीमहारी तलावाचा पारीवरून झेप घेतली. त्यावेळीचा हा प्रसंग पत्रकार देवानंद शेंडे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यांनीच सर्वप्रथम फेसबुक आणि YouTube वर अपलोड केला.

नागपूर येथील एपबिपी माझ्या च्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांना तो पाठविला. त्यांनीच सर्वप्रथम वृत्त प्रसारित केले. पुढे तो इतका वायरल झाला की अनेकांनी व्हॉट्स ॲपवर स्टेटस मध्ये ठेवलाय. तो व्हिडिओ आपल्याच गावाच्या तलावावर चा असून, तो मी स्वतः काढला असे छातीठोकपणे सांगत होते.

या मागील सत्य काय, हे शोधण्यासाठी च हे विशेष वृत्त खबरबात ने प्रकाशित केले आहे.


देवानंद शेंडे यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्कासाठी
+91 88882 87548

The true story of the deer #viralvideo

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.