राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका , चंद्रपूर मार्फत कंत्राटी तत्वावर विविध पदे भरण्याबाबतची जाहीरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायट महानगरपालिका , चंद्रपूर मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचे अंमलबजावणी करीता सन 2021-22 करीता मंजुर असलेल्या मनुष्यबळांपैकी सद्यस्थितीत रिक्त असलेल्या वैद्यकिय अधि ( पुर्णवेळ ) , फार्मासिस्ट , ए.एन.एम. या पदांकरीता ईच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पात्र उमदेवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार आहे . उमेदवारांनी भरावयाचा अर्ज , शैक्षणिक अर्हता , अनुभव , अर्जाचा विहित नमूना व अर्ज करण्याची पध्दती इ .
बाबतची सविस्तर माहिती https://www.cmcchandrapur.comया संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता , अनुभव इत्यादीबाबतचा स्वस्वाक्षरीत ( Self Attested ) प्रमाणपत्रांसह अर्ज दिनांक 25.01.2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत किवा त्यापुर्वी खालील पत्त्यावर सादर करावेत .
उमेदवारांनी Hard copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील . ई - मेल किंवा तत्सम व्दारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत .
पत्ता : आरोग्य विभाग , चंद्रपूर शहर महानगरपालिका , चंद्रपूर 3 रा माळा , गांधी चौक चंद्रपूर.
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.