●सध्या देशात व राज्यात कोविडची परिस्थिती आहे. त्यात देशाला वारंवार लॉकडाऊन सहन कराव के लागत आहे. यामुळे देश व राज्यात शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. सध्या पुन्हा कोविड या नवीन वेरीएट डोक वर आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्था ठप्प करण्यात आली. एकीकडे राज्यात बार, हॉटेल, सिनेमागृहे सुरु मात्र शाळा, महाविद्यालयांना टाळेबंदी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने व राज्य सरकारने को मोठा वाजागाजा करीत लसीकरण सुरु आँ केले. त्यात ज्यांचे वय १५ वर्षावरील सर्वचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात बहुतांश कॉलेजच्या विद्यार्थी यांनी आपल लसीकरण करवून घेतल असून त्याची सटीफिकीट ही कॉलेज ला सादर केली आहे. हे केल्यानंतर काही दिवस कॉलेज सुरळीत सुरू झाले पण काही दिवसातच पुन्हा एकदा कॉलेज बंद करण्यात आले आणि पुन्हा विद्यार्थी यांन नको ते ऑनलाईन शिक्षण सुरू करण्या आले.
आज देश डिजिटल स्वरूपात क्रांती करत आहे यात इंटरनेट मोठी भूमिका बजावत आहे. त्यामुळे अशा भयानक कोविड च्या परिस्थीतीत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन वर्ग व ऑनलाईन पेपर घेण सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात याबाबतची खूप मोठी समस्या सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्याना बौद्धिक
अपंग तसेच बेरोजगार बनवत आहात. एकीकडे राज्यात बार, हॉटेल, सिनेमागृहे, धार्मिक स्थळे सुरू आहेत पण विद्येची मंदिरे सतत बंद केली जात आहेत. सरकारचा सर्व जोर शाळा, महाविद्यालये बंद करण्यावरच का ?? सर्व कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थी ऑफलाईन क्लासेस करायला तयार आहेत. पण सरकार आमच्या शिक्षणावर सतत गदा आणत आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थी यांचे डोके खाली होत आहेत. करिता मायबाप सरकारला विनंती आहे की विद्यार्थ्याच्या. आयुष्यासोबत खेडू नका आणि लवकर शाळा महाविद्यालये सुरू करावेत, अशी मागणी व विनती प्रफुल प्रकाश पाैनिकर( praful p paunikar) यांनी करण्यात आली.