10 दिवसाच्या बाळाला विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
8 तासात केला उलघडा
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही
13/01/2022 रोजीचे रात्रौ दरम्याण शासकिय रुग्णालय चंद्रपुर येथे पिडीत महीलेने एका बाळाला जन्म दिला . सदर महीला रुग्णालयात दाखल असताना तिच्या घराशेजारी राहणारी महीला नामे मिना राजु चौधरी ही तिला नेहमी भेटण्याकरीत येत होती .
दि . 15/01/2022 रोजी रूग्णालयातुन दिला सुटि देण्यात आली . मिना राजु चौधरी हिने पिडीत हीला तिच्या बाळासह घरी न नेता सरळ लोहारा येथिल लोटस या होटल मध्ये घेवून गेली व त्याठिकाणी तिला खोटी बातावणी करूण सांगण्यात आले कि तुला एच.आय. व्हि असुन तु जर बाळाला तुच्या जवळ ठेवले तर बाळाला सुदधा एच.आय. व्हि होवु शकतो . त्यामुळे माझे ओळखिचे नागपुर येथिल लहाण मुलांनी सांभाळ करणारे एन.जी.ओ. आहे मी त्यांना माझे सोबत घेवुन आलो आहे . तु बाळ त्याचे ताब्यात देवनु दे असे सांगण्यात आले त्यावरूण पिडीत हिणे भिति पोटि घाबरूण 10 दिवसाचे बाळ नागपुर येथुन आलेल्या 3 महिलाच्या ताब्यात दिले .
दि .18 / 01 / 2022 रोजी मिना राजु चौधरी हि पिडीत हिच्या घरी जावुन तिला 49,000 / -रू दिले . त्यावेळी पिडीताने पैसे कश्याचे याबाबत विचारणा केली असता . आपले बाळ साबाळत असल्याने त्यांनी आपल्याला हे पैसे दिले असे सांगितले त्यावरूण पिडीत हिला शंका निर्माण झाली तर तिने बाळाला भेटायचे आहे असे सांगितले त्यावर मिना राजु चौधरी हि उडवाउडवीचे उत्तर देवू लागली होती त्यावरूण पिडीत हिला शंका आली कि , मिना चौधरी हीणे आपल्या बाळाला विकले असु शंकते त्यावरूण पिडीत हिने मा . अप्पर पोलीस अधिक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संपूर्ण घटना समजुण घेतली त्यावरूण पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध कमाक 53 / 2022 कलम 370 417 , 420 , 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात सदर घटनेचे गार्भिय जास्त असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शांखा प्रमुख पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सांगण्यात आले त्याचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे यांना त्याचे पथकासह पुठिल कार्यवाही करण्याकामी रवाना करण्यात आले .
घटनेची माहीती घेतली असता यातील प्रमुख आरोपी नामे मिना राजु चौधरी हिला ताब्यात घेण्यात आले व तिला विचारपुस केली असता तिने तिचा प्रियकर नामे जाबिर रफिक शेख वय 32 रा . बल्हारशा व अजुम सलीम सय्यद वय 43 रा . भिवापुर वार्ड चंद्रपुर यांचे मदतिने नागपुर येथिल चनिता कावडे , पुजा शाहु शालीनी गोपाल मोडक सर्व रा . नागपुर यांना सदर नवजात बाळ 2,75,000 / -रू किंमतीला विकल्याचे कबुल केले .
त्यावरूण तात्काळ कोणताही विलंभ न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे यांचे सह एक पथक नागपुर करीता रवाना करण्यात आले . त्यांनी आपले गोपनिय माहीती व तपास कौशल्य वापरूण वरील नमुद तिन्ही महीलांना बददल माहीती घेतली असता दोन महीला रूग्णालयात स्टाफ नर्स म्हणून काम करीत असल्याची माहीती प्राप्त झाली त्यावरूण त्यांना नागपुर येथुन ताब्यात घेतले व 10 दिवसाचे वाळा बाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाळ हे चंद्रपुर येथे दिल्याचे धक्कादायक माहीती प्राप्त झाली . त्यावरूण नागपुर येथिल महीला नामे वनिता मुलचंद कावडे पुजा सुरेद्र शाहु शालीनी गोपाल मोडक यांना ताब्यात घेतले व तात्काळ चंद्रपुर येथे घेवुन आलो . नमुद महीला यांनी बाळाला कोणाला विकले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाळ हे स्मीता मानकर नावेच महीलेला दिल्याचे माहीती समोर आली त्यावरूण तात्काळ महीलेचा पत्ता प्राप्त करूण तिच्या घरी गेलो असता नवजात बाळ सुखरूप असल्याचे दिसुन आले .
नवजात बालकास ताब्यात घेवून त्याची वैधिकीय तपासणी करीता त्यास जिल्हा साम्याण रुग्णालय चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले असुन सदर प्रकणात एकुण 6 आरोपी नामे 1 ) मिना राजु चौधरी वय 34 रा.शाम नगर चंद्रपुर 2 ) जाबिर रफिक शेख वय 32 रा . बल्हारशा 3 ) अजुंम सलीम सय्यद वय 43 रा . भिवापुर वार्ड चंद्रपुर 4 ) बनिता मुलचंद कावड़े वय 39 5 ) पुजा सुरेद्र शाहु वय 29 धंदा स्टॉफ नर्स 6 ) शालीनी गोपाल मोडक वय 48 धंदा स्टॉफ नर्स तिन्ही रा . नागपुर यांना अटक करण्यात आली असुन पुठिल तपास रामनगर पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची यशस्वी कामगीरी मा . श्री . अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधीक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनि जितेद्र बोबडे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे संजय आतकुलवार , अमोल धंदरे संतोष येलपुरवार कुंदनसिंग बावरी रविंद्र पंधरे , गोपाल आतकुलवार नितीन रायपुरे प्राजल झिलपे महीला पोलीस अपर्णा मानकर निराशा तितरे यांचे पथकाने केली .