नवेगावबांध येथे सर्वसाधारण सभा संपन्न.
श्री कच्छ गुर्जर क्षत्रिय सार्वजनिक ट्रस्ट नागपूर विभागाची वार्षिक साधारण सभा आज दिनांक २३ जानेवारी रोजी रविवारला सकाळी ११.३० वाजता हिल टॉप विश्रामगृहात संपन्न झाली. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित प्रमुख अमृतलाल टाक हे होते. गेल्या ३७ वर्षांपासून हे ट्रस्ट कार्यरत असून, समाजातील गरजू व्यक्तींना शैक्षणिक ,वैद्यकीय आणि आर्थिक मदत करीत असते.
या सभेत गेल्या ३७ वर्षाच्या परंपरेनुसार पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निर्विरोध निवड करण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील अमृतलाल टांक यांची प्रमुखपदी निवड झाली. तर सचिवपदी गोंदिया येथील नितेश परमार यांची निवड झाली. उपप्रमुख म्हणून बालाघाट येथील जितेंद्र परमार, उपसचिव गोंदिया येथील कमलेश राठोड, कोषाध्यक्षपदी जयंतीलाल वेगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेहूल चव्हाण नागपूर, दीपेश परमार नागपूर, दिलीप चव्हाण बल्लारशा, प्रेमभाई जेठवा वर्धा, किशोर टाक शेगाव यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून शिवलाल भाई टाक यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे संचालन माजी मंत्री प्राध्यापक चुन्नीलाल चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार नितेश परमार यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत झाले स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.