कमलापूर हत्ती कॅम्प स्थानांतरणाचा पुनर्विचार व्हावा
राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ सदस्य बंडू धोतरे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी
*कमलापुर हत्ती कैम्प समस्या सोडवून विकसित करण्याची मागणी*
कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देऊन स्थानिकाशी चर्चा केली
गडचिरोली जिल्ह्यातील हत्तीचे स्थानांतरण करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करून हत्तीना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार कायम ठेवण्याची मागणी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष उध्दवसाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गडचिरोली जिल्हयात वाढत्या वाघांच्या संख्येसोबतच वाघ-मानव संघर्ष वाढत आहे. सोबतच छत्तीसगड राज्यातून आलेल्या रानटी हत्तीचा संघर्ष सुध्दा वाढला. यातही अनुभवी मनुष्यबळ, संसाधनाची पुर्तता नसताना मात्र, अधिकारी-कर्मचारी या संघर्षाला सकारात्मकरित्या सामोरे जात आहेत. परराज्यातून आलेल्या हत्तीना सुरक्षितरित्या सांभाळ करण्याची भूमिका कौतुकास्पद आहे. पण, दुसरीकडे गडचिरोलीतील ‘पातानिल हत्ती कॅम्प’ व ‘कमलापुर हत्ती कॅम्प’ मधील हत्तीचे होणारे स्थांनातरण, गुजरात मधील प्राणीसंग्रहालयाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयाचा पुर्णविचार व्हावा, अशी मागणी बंडू धोतरे यांनी निवेदनातून केली आहे.
इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात इको-प्रो टीमने कमलापुर हत्ती कॅम्प व पातानिल हत्ती कॅम्पला 27 जानेवारीला भेट देत माहीती जाणुन घेतली होती. यावेळी स्थानिकांशी चर्चा करण्यात आली. मागील महिन्यात कमलापूर ग्रामसभेनेसुध्दा कमलापूर येथील हत्तीचे स्थानातंरण करण्यात येऊ नये, याबाबत ठराव घेतलेला आहे.
मागील पाच दशकापेक्षा अधिक काळापासून वनांच्या कामात सहकारी असलेले सदर दोन्ही कॅम्प मधील हत्ती, ज्यात 85-90 वर्षाचे सुध्दा हत्ती आहेत. आज त्यांचा कुठलाही वनाच्या कामात उपयोग नाही. मनुष्यबळ नाही. काही हत्ती म्हातारे झाले आहेत. वैद्यकीय व्यवस्था नाही, आदी कारणे दाखवून त्यांना प्राणीसंग्रहालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
कमलापुरमधील हत्ती येथिल स्थानिक वारसा आहे. तो जतन करणे अत्यावश्यक आहे. कमलापूर हत्ती कॅम्पला स्थानिक, लगतच्या जिल्हयातून येणारे पर्यटक सोबतच, बाजुच्या तेलंगाणा राज्यातुन पर्यटक येतात. कुठलेही अधिक पर्यटन विकासाची कामे न करता, अधिक खर्च न करता मागील अनेक दशकांपासुन येथे पर्यटन स्थळ निर्माण झाले. यातुन दुर्लक्षित, उपेक्षित असलेल्या निसर्गसंपन्न जिल्हयातील काही भागात पर्यटन विकासांची संधी, आणि नागरीकांना रोजगार देण्याची ही संधी साधणार आहोत. तसेच यातून कर्नाटक, केरळ व तामिळनाडु राज्यासारखे येणाऱ्या पर्यटकांचे हत्तीला चारा भरवित होणारा परस्परसंवाद, यातुन होणारी जनजागृती व वन्यजिवांप्रती प्रेम वाढीस लागत असतो. वरिल राज्याच्या धर्तीवर सुध्दा येथिल हत्ती कॅम्प विकसित करण्याची वनविभागाला मोठी संधी आहे. त्याकरिता वरिष्ठ वनाधिकारी, स्थानिक वनाधिकारी, तज्ञ आणि स्थानिक यांची एक समिती तयार करून सदर कमलापुर हत्ती कैम्प चा विकास व समस्या सोडविन्यात यावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात, त्यांचे नेतृत्वात वन-वन्यजिवांना ‘राजाश्रय’ मिळाला. त्यामुळे हत्तीचा वनातील मुक्तसंचार कायम राखण्याच्या दृष्टीने या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी विनंती बंडू धोतरे यांनी केली आहे.