लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी
जानेवारी महिन्यात कोरणा ची तिसरी लाट मोठ्या झपाट्याने सुरू आहे मात्र रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता सौम्य आहे त्यामुळे चंद्रपूर शहरातील सुमारे 90 टक्के गृहविलगीकरणात करणार आहेत.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात रविवारी एकशे एक रुग्ण आढळले आहेत. यासोबतच चंद्रपूर शहरातील आसपासच्या खेड्यातील म्हणजे तालुकाभरातील 28 रुग्न सुद्धा बाधित आहेत. चंद्रपूर शहरात आता एकूण रुग्ण संख्या सहाशेच्या आसपास पोहोचली आहे.
चंद्रपूर शहरात कोरणा लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी तीव्रता कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांनी कोरोणा ची दुसरी मात्रा देखील पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन महानगर प्रशासनाने केले आहे. शिवाय गृह विलगीकरनात असलेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाने नेमून दिलेले नियम आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.