कोरोना ला हरविण्यासाठी लस हे एकमात्र उपाय असून, 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेला आज रविवारी एक वर्ष पूर्ण झालेला आहे. चंद्रपूर शहरांमध्ये या एक वर्षांमध्ये 15 ते पुढील वर्षाच्या दोन लाख 45 हजार व्यक्तींनी लस्सीची पहिली मात्रा पूर्ण केली आहे.
चंद्रपूर (Chandrapur) शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षभरापासून 21 केंद्रांच्या माध्यमातून कोवीशील्ड आणि कोवक्सिन ही लस दिली जात आहे. प्रारंभीच्या काळात हेल्थ वर्कर आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. शहरात पंधरा वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या सुमारे 2 लाख 63 हजार व्यक्तीला लस देण्याचे नियोजित आहे. मागील वर्षभरात अठरा वर्षांपेक्षा मोठा असलेल्या दोन लाख 40 हजार नागरिकांनी घेतली. यावर्षी शासनाने जानेवारी महिन्यापासून 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनाही लसीचे नियोजन केले असून आतापर्यंत 4370 मुलांनी लस घेतली आहे. 10 जानेवारी पासून फ्रन्टलाइन वर्कर, हेअल्थ वर्कर आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी तिसरे सुरू झाले असून, आतापर्यंत 1113 व्यक्तींनी लसीची तिसरी मात्र देखील घेतली आहे.
Corona Vaccinate health workers and frontline workers