: भोई समाजाचे लोकनेते मत्स्यमहर्षी स्वर्गीय खासदार बर्वे यांच्या ३८ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून दि.१६ जानेवारीला स्थानिक श्रीसंत झिंगुजी महाराज देवस्थान येथे एका छोटेखानी समारोहात भोई समाजाचे मुखपत्र भोई गौरव या मासिकाचे चतुर्थ वर्षातील पहिल्या अंकाच्या स्वर्गीय खासदार जतीरामजी बर्वे स्मृति विशेषांकाचे प्रकाशन भोई समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर नागपुरे यांचे अध्यक्षतेखाली तथा प्रमुख अतिथी प्रा.डॉ. यशवंत घुमे यांचे शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले.
सर्वप्रथम श्रीसंत झिंगुजी महाराज व स्व. खा. जतीरामजी बर्वे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख नंदुभाऊ पढाल,सामाजिक कार्यकर्ते दिलीप मांढरे, भारत नागपुरे, जेष्ठ नागरिक श्रीराम पढाल, युवा कार्यकर्ते गौरव नागपुरे, सुभाष मारबते, किशोर बावणे, दिलीप नागपुरे,कवि क्षितिज शिवरकर,भारत आत्राम, सुरज नागपुरे आदी उपस्थित होते.
भोई गौरव हे मुखपत्र अतिशय सुबक असून समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत समाज विषयक माहिती पोहचविणारे मासिक आहे.स्वर्गीय खासदार जतीरामजी बर्वे स्मृति विशेषांकाचे प्रकाशनाचे सौभाग्य मला लाभले .हे एव्हढ्यावरच न थांबता भोई गौरव या मासिकाचे रूपांतर नियमित अंकात व्हावे जेणेकरून समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तेव्हढीच मदत होईल.असे मत प्रमुख अतिथी तथा प्रकाशक प्रा.डॉ. घुमे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर नागपुरे, नगरसेवक नंदू पढाल, कलाशिक्षक सुभाष मारबते यांनी स्वर्गीय खा.बर्वे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मांढरे यांनी संचालन क्षितिज शिवरकर यांनी तर आभार गौरव नागपुरे यांनी केले.या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता साहिल नागपुरे, पवन मांढरे यांनी सहकार्य केले.