सौंदर्यीकरण/खोलीकरण भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामाला तलावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजे आणि भोसले काळातील या आठवणी आणि वैभवशाली वस्तू जटन कारण्यासाठ भरघोष निधी देऊ असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता चंद्रपूर शहर येथील खनिज प्रतिष्ठान अंतर्गत रामाळा तलाव सौंदर्यीकरण/खोलीकरण भूमिपूजन सोहळा ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांची उपस्थिती होती.
येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्याने सौंदर्यीकरण/खोलीकरण कर्णयसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला. त्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
Guardian Minister Vijay Vadettiwar | MP Balu Dhanorkar | MLA Kishor Jorgewar | President of Eco Pro Bandu Dhotre