ओबीसी समाजाची जतनिहाय जनगणना करण्यात यावी या साठी जंतर मंतर न्यू दिल्ली येथे आंदोलन
दि. 14.12.2021
ओबीसी समाजाची 2021मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकाने करण्यात यावी यासाठी न्यू दिल्ली येथे दिनांक14 डिसेंबर ला आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रामुख्याने खासदार गाला जयदेव,खासदार गोरणटला माधव, खासदार केसीनेनी नाणी, खासदार किंजरप्पा राम मोहन, खासदार कनाकमेडला रविंदर,राज्यसभा खासदार पिल्लू सुभाषचंद्र बोश,खासदार मोपिदेवी वेंकता रमना , खासदार मारीनेरी भारत,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, ऑल इंडिया बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगाणा चे अध्यक्ष जाजूला श्रीनिवास , ऑल इंडिया बीसी वेलफेअर असोसिएशनआंध्रप्रदेश चे अध्यक्ष शंकर अण्णा, शरद वानखेडे , संजय पन्नासे ,विक्रम गौड, क्रांती अण्णा उपस्थिती होती, या आंदोलनात केन्द्र सरकारने 2021 मधे राष्ट्रीय जनगणना मध्ये जातनिहाय जनगणना करावी , केंद्र सरकारने स्थानिक स्वराज संस्थेतिल राजकिय आरक्षण 247 (T) व 243 (D ) सेक्शन 6 मध्ये घटना दुरुस्ती करून ओबीसींना 27% राजकिय आरक्षण दिले पाहिजे ,केंद्रात ओबीसी मंत्रालय झाले पाहिजे, क्रिमिलेअरची मर्यादा 20 लक्ष करण्यात यावी, ,सरकारी कर्मचा-यांना पदोन्नतीमधे आरक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले त्या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ऑल इंडिया बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा व आंध्रप्रदेश व देशातील बहुसंख्य ओबीसी समाज जंतर मंतरवर उपस्थित होता