Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २९, २०२१

घंटा गाडी चालवणाऱ्या महिलेच्या मुलाची सैन्यात भरती

घंटा गाडी चालवणाऱ्या महिलेच्या मुलाची सैन्यात भरती





प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गाठला यशाचा मार्ग

चंद्रपूर: आई घंटा गाडी चालवते, वडील कंत्राटी नौकरीवर. घरी बेताची परिस्थिती. त्यामुळे शिक्षण घेतांना असंख्य अडचणी येत होत्या. आपल्याला लवकर नोकरी शोधायची आहे, असा विचार अजित खिल्लन या मुलाच्या मनात होता. त्यातून त्याने सैन्य भरती विषयी माहिती घेतली. त्याच्या मनात देखील सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याची जिद्द निर्माण झाली. त्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. रोज सकाळी- संध्याकाळी धावायला जाणे, खेळणे, कठोर मेहनत घेतली. त्याच्या परिश्रममध्ये त्याच्या शेजारी राहणारे काँग्रेस चे कार्यकर्ते सुनील चौहान यांनी देखील त्याची मदत केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अजितने ही वाट धरली. त्यात तो यशस्वी झाला. त्याला अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्ती मिळाली आहे.

याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य- ठेमस्कर यांना सुनील चौहान यांनी दिली, तेव्हा त्याचे अभिनंदन करण्यासाठी ठेमस्कर अजित याच्या वॉर्डात सावरकर नगर मध्ये गेल्या व त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या व त्याचा आत्तापर्यंत चा प्रवास समजून घेतला तसेच त्याच्या आई वडिलांची देखील विचारपूस केली. अजित ने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई राजेश्वरी वडिला मनोरंजन खिल्लन यांना दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, सेवा दल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, ब्रिजेश तामगडे, सुनील चौहान, अमित यादव, आकाश वर्मा, सलमान पठाण, करण नायर, राहुल यादव, सागर पोचम, सागर पट्टेबहादूर, मंगेश चिवंडे, अजय शर्मा,आकाश ठाकूर यांची उपस्थिती होती.

The son of a woman who drives a bell enlists in the army  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.