Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

गोंडवाना संग्रहालयाचा उत्तम आराखडा तयार करा-ॲड.के.सी.पाडवी

 गोंडवाना संग्रहालयाचा  उत्तम आराखडा तयार करा-ॲड. के. सी.  पाडवी



पुणे दि.३०-आदिवासी समाजातील कला, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी नागपूर येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या गोंडवाना संग्रहालयाचा सविस्तर आणि उत्तम आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.


आदिवासी संशोधन आणि विकास संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, सहसंचालक जान्हवी कुमरे, जात पडताळणी सहआयुक्त आर.आर.सोनकवडे, संशोधन अधिकारी श्यामकांत दौंडकर,  हंसध्वज सोनवणे आदी उपस्थित होते.


गोंडवाना म्युझिअमच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या कला व संस्कृतीचे समुचीत दर्शन घडेल असा आराखडा तयार करावा असेही ॲड.पाडवी म्हणाले. त्यांनी जातपडताणी समितीच्या कामकाजाची व ऑनलाईन सुविधेची माहिती  घेतली. तत्पर्वूी त्यांनी संस्थेच्या इमारतीतील संग्रहालयाची पाहणी केली.


आयुक्त डॉ.भारूड यांनी सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.

#Gondwana #nagpur


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.