Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

चंद्रपूरचे तरुण हनी ट्रॅपच्या जाळ्यात :चंद्रपुरात अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून पैशासाठी ब्लॅकमेल करत तरुणांची फसगत

ललित लांजेवार(खबरबात):
तुमच्या हातात स्मार्ट फोन आहे,तर मग व्हा सावधान,आणि तुम्ही पण व्हा स्मार्ट,कारण तुम्ही स्मार्ट असाल तर या मोहजाळ्यातून वाचाल..तुम्हाला पण येऊ शकतो एखाद्या अनोळखी मुलीचा व्हिडीओ कॉल आणि होऊ शकते तुमची फसगत,हो कारण तुम्ही अडकू शकता हनी ट्रॅपच्या जाळ्यात.

सध्या देशात कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने पैसे कमावण्याच्या नादात तरुण महिला आणि मुली पुरुष ,तरुणांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढत असल्याचे दररोज प्रकार घडत आहे. पहिले त्यांच्या सोबत मैत्री करून कालांतराने त्यांच्या सोबत नग्न होत व्हिडीओ चॅट करून त्या व्हिडीओ कॉलिंगची रेकॉर्डिंग करून परत त्याच तरुणांना पैस्यासाठी ब्लॅकमेल करत आहेत. असाच प्रकार चंद्रपुरातील गोंडपिपरीत घडला.

एका मुंबईच्या तरूणीने सध्या सर्वांची झोप उडविली आहे. मुंबईची असल्याची बतावणी करीत तरूणी व्हिडिओ कॉलकरून अश्लिल चाळे करत तरूणांना घायाळ करायची.मग हे नेहमीच व्हायचं, तरुण नयन सुख घ्यायचे, मात्र त्या वेळेपुरते त्यांचे आंबटशोक पूर्ण व्हायचे. मात्र नंतर जे व्हायचा त्यात त्यांचा गेम पिटायचा....

ती तरुणी निर्वस्त्र होवून तरुणाला १५-२० मिनिटं बोलायला भाग पाडायची.तरुणी व्हिडिओ कॉलवर अश्लिल चाळे करून व्हिडिओ रेकॉर्ड करायची आणि त्यानंतर त्याचा वापर तरुणांना ब्लॅकमेक करण्यासाठी करायची. व्हिडिओ व्हायरल करण्याची धकमी देत पैश्याची मागणी करायची. ती ऐवढ्यावरच थांबत नाही तर तिचे सहकारी पोलीस असल्याची बतावणी देखील करायची.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या साऱ्या प्रकाराने अनेक तरुण फसले आहेत. निव्वळ गोंडपिपरीत अश्या तरूणांचा आकडा मोठा असल्याचं बोललं जात आहे. बदनामीचा भितीने तरूणांनी पोलीसाकडे जाण्यास पाठ फिरविली आहे. या साऱ्या प्रकाराने तरुण मुलं मानसिकरीत्या खचत आहेत. अश्यात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातील वकील तरूणाने गोंडपिपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून तरुणीचाही शोध घेण्याचं काम सुरू आहे.
काय आहे हणी ट्रॅप
हे हनी ट्रॅप काही नवीन नाही. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल पासून तर सामान पैसेवाल्या नागरिकांना फसवण्यात येतं. पण आता सोशल मीडियावरून हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.हनी ट्रॅप म्हणजे सुंदर मुलीचे आमिष दाखवून जाळ्यात फसवणे आणि आर्थिक लुबाडणूक करणे.किव्हा एखाद्याला खोटं खोटं प्रेमाच्या जाळ्यात ओढणं.

देशात हनी ट्रॅप गँगने आतापर्यंत महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार इत्यादींना आपल्या ट्रॅपमध्ये अडकवलंय.सेक्स व्हिडीओ, अश्लील चॅट या सगळ्यांवरून ब्लॅकमेलिंग केलं.हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.