Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

पाच नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर | #Chandrapur #Nagarpanchayat

 पाच नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

Ø सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवतीचा समावेश


चंद्रपूर दि. 23 नोव्हेंबर : विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन नागपूर यांच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतीम आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सावली नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1 व 15, अनुसूचित जाती (स्त्री)करीता  प्रभाग क्रमांक 16 व 17, अनुसूचित जमातीकरीता 0 तर अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 5, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3 व 10, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,8,12,13 व 14 तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 6, 7,9 व 11 जाहीर करण्यात आले आहे.

पोंभूर्णा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1 तर अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 3 व 15, अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 10 तर अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4 व 17 तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 8 व 11, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 5,7,13 व 14, सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 2, 6, 9, 12, 16 जाहीर करण्यात आले आहे.

गोंडपिपरी  नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 14 तर अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 9 व 13, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 15, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 6 व 11, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक  1,3,5,7 व 17 तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 8,10, 12 व 16 जाहीर करण्यात आले आहे.

कोरपना नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 16, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 11 , अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 10 तर अनुसूचित जमाती(स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 13 व 14. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2 , नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता  प्रभाग क्रमांक 1 व 17, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक  3,4,5,7 व 9 तर सर्वसाधारण (स्त्री)करिता प्रभाग क्रमांक 6,8,12, व 15 जाहीर करण्यात आले आहे.

जिवती नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 0, अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 10, अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 12 व 16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 13 व 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 7 व 15, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 3,5,6 व 9 तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 2,4,8,11 व 17 जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.