Aasara Foundation |फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष पायल कापसे यांनी सदर सामाजिक कार्याची माहिती देताना सांगितले की आज देशात अनेकांना आधाराची गरज भासते मात्र ती मदत त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरजू नागरिकांसाठी आम्ही नवी सुरुवात केली असून त्याची नोंदणी प्रक्रिया ही १४ नोव्हेम्बर ते २५ डिसेम्बर २०२१ पर्यंत राहणार आहे.
आसरा फाऊंडेशन हे सदैव नागरिकांच्या मदतीसाठी तयार असणार असून सध्या या उपक्रमाची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून होत आहे, हळूहळू उर्वरित जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आसरा फाऊंडेशन कार्य करणार आहे.
समाजसेवेत आवड असणाऱ्या नागरिकांनी आसरा फाउंडेशन सोबत जुडण्यासाठी चिमूर तालुक्यात पायल कापसे - ९६८७२७५२४६ , चंद्रपूर मध्ये अश्विनी खोब्रागडे - ९०११३०४९१० तर नागपूर जिल्ह्यातून नोंदणी करणाऱ्यांनी शीतल कापसे - ८९७५४७२७९० यावर संपर्क साधावा..