Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०२१

नवेगावबांध येथे गोवर्धन पूजा उत्साहात साजरी.

ग्रामस्थांनी लावली बहुसंख्येने हजेरी.






संजीव बडोले  प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.५ नोव्हेंबर:-
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनानंतर दुसरा दिवस ग्रामीण परिसरात गोवर्धन पूजा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील गोवर्धन चौक आखर मोहल्ला, वडाचा चौक कुंभार मोहल्ला व बाजार येथे गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात या तिन्ही ठिकाणी गोवर्धन पुजा उत्सव गोवारी समाज बांधवांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कोरोना चे निर्बंध शिथिल झाल्यामुळे, या तिन्ही स्थळी स्त्री-पुरुष आबालवृद्धांसह स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
नवेगाव बांध व परिसरात अश्विन दशमीला आदिवासी गोवारी जमातीची प्राचीन सांस्कृतिक गायगोदन तथा  ढाल पूजा करण्यात आली. 
कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेवर दीपावलीच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पूजा  केली जाते. गोवर्धन पूजामध्ये गोधन अर्थात गाय, बैल इत्यादींची विधिवत पूजा केली जाते. आंघोळ करून आणि ध्यान केल्यावर जनावरांना डोक्यावर तेल आणि सिंदूर लावले जाते. धूप-आरती नंतर मिष्टान्न दिले जातात. दोर्‍याची देवाणघेवाण होते.सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा
आदिवासी गोवारी समाज बांधवांची ढाल पूजा संपन्न झाली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.