अर्जुनी-मोर पंचायत समिती सात जागा महिलांसाठी आरक्षित तर जिल्हा परिषदेत तीन.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद गोंदिया व त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आज १२ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात आली. यात अर्जुनी मोरगाव पंचायत समिती च्या १४ प्रभागासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात झासीनगर निर्वाचन गण सर्वसाधारण महिला, गोठणगाव अनुसूचित जाती महिला, नवेगावबांध नागरीकांचा मागास प्रवर्ग, भिवखिडकी सर्वसाधारण महिला, बोंडगावदेवी सर्वसाधारण महिला, निमगाव सर्वसाधारण, बाराभाटी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, माहूरकुडा अनुसूचित जमाती महिला, ताडगाव सर्वसाधारण, इटखेडा अनुसूचित जमाती महिला, अरुणनगर अनुसूचित जमाती, महागाव अनुसूचित जाती, केशोरी सर्वसाधारण, भरनोली सर्वसाधारण अशाप्रकारे सोडती नुसार आरक्षण राहणार आहे.तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून आकाश अवतारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, विनोद मेश्राम तहसीलदार, सोनवणे नायब तहसीलदार निवडणूक, वासुदेव लुच्चे महसूल सहायक निवडणूक उपस्थित होते. तर तालुक्यातील ७ जिल्हा परिषद जागांसाठी गोठणगाव अनुसूचित जाती, नवेगावबांध सर्वसाधारण महिला, बोंडगावदेवी नागरीकांचा मागास प्रवर्ग,माहूरकुडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ईटखेडा नागरीकांचा मागास प्रवर्ग, महागाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, केशोरी नागरीकांचा मागास प्रवर्ग सोडतीद्वारे असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्रात एकही क्षेत्र अनुसूचित जमातीच्या वाट्याला आले नाही. हे येथे विशेष उल्लेखनीय आहे. तालुक्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून देखील अनुसूचित जमाती साठी एकही क्षेत्र आरक्षित नाही. हे येथे उल्लेखनीय आहे.