Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १२, २०२१

अन त्या मुक्या जनावरांची पोलिसांनी केली सुटका.नवेगावबांध पोलिसांची कारवाई.

जनावरांची अवैध वाहतूक १० लाख ७० हजाराचा ऐवज जप्त.
चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. 


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.१२नोव्हेंबर:-
 काल 11 नोव्हेंबर रोजी खबऱ्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार चिचगड कडून नवेगावबांध, सानगडी मार्गे एका दहा चाकी ट्रक मध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशाची जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार जनार्दन हेगडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी येथील टी पॉईंट चौकात नाकाबंदी केली असता, पावणे बारा वाजेच्या दरम्यान एक दहा चाकी ट्रक क्रमांक सीजी- 07,इ- 0481 ची तपासणी केली असता, गोवंशाची काही जनावरे दोरी ने करकचून चारही पाय बांधून,तसेच जनावरे ओरडू नये म्हणून दोरीने तोंड बांधून, गर्दी करून अतिशय निर्दयतेने कोंबले असल्याचे दिसून आले. तर काही जनावरे गर्दीत अर्धमेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. गोवंशाची 27 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांची सुटका केली. जनावरांचा वाहतूक परवाना, खरेदी पावती, गाडीची कागदपत्रे पोलिसांनी मागितली असता ड्रायव्हरने आपल्याकडे नसल्याचे सांगितले. चौकशीत ही जनावरे मोंटू सिंग परवीन सिंग राहणार रायपूर छत्तीसगड राज्य याच्या मालकीची असल्याचे सदर ट्रकच्या वाहनचालकाने व इतर दोन आरोपीने सांगितले. या अवैध जनावर वाहतूक प्रकरणी पोलिसांनी प्रजेश पायकास मसीहा( वय २७ वर्षे), राहणार गणेशपुर,  जिल्हा बडोदा बाजार छत्तीसगड या वाहकासह, प्रियेसदास प्रविनदास दास (वय२२वर्षे) राहणार गणेशपूर, सुपेंद्र आरविन मसीहा(वय 19 वर्षे) राहणार गणेशपुर,मोंटू सिंग राहणार रायपूर छत्तीसगढ यांचे विरुद्ध गोवंशाच्या जनावरांच्या निर्दयतेने वागवून, कत्तलीसाठी वाहतूक करून, अवैधरित्या घेऊन जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने,त्यांच्या विरोधात कलम 5,(अ),( ब ),9, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 कलम 11(ड),( ई), प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कायदा 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास नवेगावबांध पोलिस करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.