20 टन क्षमतेचा मार्गावर 70 टन क्षमतेचे कोळसा वाहतूक
वेकोलिने आश्वासन पाळले नाही | नागरिकांत संताप
गांधी जयंती निमित्त गांधीगिरी आंदोलन
राजुरा | जिल्हा चंद्रपूर
बल्लारपूर वेकोली अंतर्गत गौवरी,साखरी,पवनी कोळसा खदानतून होणारी अवजड कोळसा वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी उद्या दिनांक 28 ऑक्टोबर ला गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. तब्बल महिन्याभरापूर्वी यास मार्गावर गावकऱ्यांनी वाहतूक रोखलेली होती. त्यावेळी वेकोलिचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र तब्बल महिना लोटूनही गावकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळलेले नाही . त्यामुळे नागरिकांत प्रचंड संताप आहे.
20 टन क्षमता असलेल्या मार्गावरून 70 टन क्षमतेची कोळसा वाहतूक सुरू आहे. महाकाय खड्डे पडलेले आहेत. धुळीचा प्रचंड त्रास होत आहे .अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे .याकडे आरटीओ आणि पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वेकोलीने आश्वासन पाळले नाही याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला गांधीगिरी करून नागरिकांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले आहे.
महिन्याभरापूर्वी झालेल्या आंदोलनात
वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. गौरी पवनी साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजलेले आहेत. प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत .या मार्गावरील नाल्यावर बांधण्यात आलेले पूलही धोकादायक स्थितीत आहेत. याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रास होत आहे. ताडपत्री न झाकता वाहतूक सुरू असल्यामुळे धावत्या वाहनातून कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडतात त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका आहे. वेकोलिचे अधिकारी यांनी नागरिकांच्या मागण्यांची पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासन विसरल्याने नागरिकांना आंदोलन करावे लागत आहे. गो गावकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नाही तर कोळसा वाहतूक होऊ दिली जाणार नाही असा इशारा भास्कर जुनघरी यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेला होता. मात्र अजूनही जैसे थे कोळसा वाहतूक सुरू असल्यामुळे आंदोलन करण्यात येणार आहे.
WCL Rajura Gandhigiri Bapu Birth AN