Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०१, २०२१

कोरोना लस घ्या; खरेदीवर सूट मिळवा | चंद्रपुरात व्यापाऱ्यांचा निर्णय

 


लसीची दुसरी मात्रा घेतलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश

कोरोना लस घ्या मिळवा; खरेदीवर सूट
Date : 01 Oct 2021

  सध्यास्थिती कोरोनाची लाट ओसरल्याने येत्या सात ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार राज्यसरकार करीत आहे. येत्या आठवड्यात नवरात्रीनिमित्त मोठी गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढू नये, यासाठी मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावर मनपाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच लसीकरण करणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूर शहरातील कोरोना लसीकरणाचा टप्पा वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील व्यापारी मंडळ, मंदिर संस्थान आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात पार पडली. या बैठकीला महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वनीता गर्गेलवार यांच्यासह आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखून धरण्यासाठी कोरोना लसीकरण अत्यावश्यक आहे. चंद्रपूर शहरातील एकूण पात्र नागरिकांपैकी सद्यस्थितीत 50 टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेले आहे. मात्र संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने लसीकरणावर अधिक भर देण्याचा प्रयत्न चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने केला जात आहे. या लसीकरणाच्या उपक्रमाला लोकसहभाग मिळावा, यासाठी व्यापारी मंडळ, किरकोळ विक्रेते, सराफा व्यवसायिक, मंदिर संस्थानचे पदाधिकारी यासह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा, धार्मिक स्थळे, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांवर बंदी आहे. परंतु, हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाने ८ वी ते १२ वी वर्गापर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ५ ते ७ पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

चंद्रपूर शहरातील व्यापारी, त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत फेडरेशन ट्रेङ ऑफ कॉमर्स इन्डस्ट्रीच्या पुढाकारातून जलाराम मंदिर येथे केंद्र सुरू आहे. यात आणखी प्रतिसाद मिळविण्यासाठी कोरोना लस घेणाऱ्याना विशेष बक्षिसदेखील देण्यात येणार आहे.



चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

(आरोग्य विभाग)

शनिवार, ता. २ ऑक्टोबर २०२१


लसीकरण केंद्र

१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी

पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)


१.  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड

२. गजानन मंदिर, वडगांव, नागपूर रोड 

३. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड

४. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली रोड

५. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, समता चौक बाबूपेठ वॉर्ड

६. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक मनपा शाळा, भानापेठ वार्ड

७. विद्या विहार कॉन्व्हेंट, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकूम

८. कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकार नगर

९. जगन्नाथ बाबा मठ, जे. बी. नगर

१०. रवींद्रनाथ टागोर मनपा शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड

११. पोद्दार कॉन्व्हेंट, अष्टभूजा, बायपास रोड 

१२. लोकमान्य टिळक प्राथ. मनपा शाळा, पठाणपूरा रोड समाधी वार्ड 

१३. सावित्रीबाई फुले मनपा शाळा, नेताजी चौक, बाबूपेठ

१४. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बाबूपेठ

१५. मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, तुकूम

१६. जलाराम मंदिर, एस. पी. कॉलेज जवळ, गंजवॉर्ड 


पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)

१. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोर

२. एरिया हॉस्पिटल, लालपेठ कॉलरी 

३. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर


 सूचना :

- नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य. 

- दुसऱ्या डोससाठी येताना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत अनिवार्य.

- संपूर्ण लसीकरण १०० टक्के ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल. 

- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घ्यावा.


लसीकरण आपल्या दारी 

आपल्या घरी अंथरुणास खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी कोव्हीड लस द्यावयाची असल्यास संपर्क करा

भ्रमणध्वनी : 9823004247


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.