Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

निरोगी आणि सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती : डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे |



गडचांदूर:- येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक १२ ऑक्टोबर, २०२१ ला "आरोग्य भारती चंद्रपूर या सामाजिक संघटनेच्या व सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर " यांच्या संयुक्त विद्यमाने शरदराव पवार महाविद्यालयाच्या सभागृहात धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवबाग मल्टीडीसीप्लीनरी  कार्डिअक केअर क्लिनिक चे संचालक व आयुर्वेद डॉक्टरांची संघटना निमा, चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे (Dr. Laxminarayan Sarbere) यांनी आपल्या मार्गदर्शनातून निरोगी आणि सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आहार, विहार आणि निद्रा ही त्रिसूत्री जर अंगीकारली तर  जीवन निरोगी राहील याविषयी विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्माईल फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजना नागतोडे व आरोग्य भारतीच्या सदस्या किरण ताई बुटले ,गडचांदूर येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. सोनटक्के, शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे, कार्यक्रमाची आयोजिका  भुवनेश्वरी गोपनवार उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी आयुर्वेद ,मानवी जीवन शैली,आरोग्य , धन्वंतरी याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन महेंद्रकुमार ताकसांडे, प्रस्ताविक किरण ताई बुटले तर आभार प्रदर्शन ज्योती चटप यांनी केले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 


Dr. Laxminarayan Sarbere


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.