Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

टाटा कन्सल्टन्सीमध्ये 35 हजार पदांवर भरती! | TCS Recruitment 2021

टाटा कन्सल्टन्सीमध्ये 35 हजार पदांवर भरती! TCS Recruitment 2021

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही १९६८ साली स्थापन झालेली, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) (TCS) तर्फे २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सना संधी देण्यात येणार आहे. पहिल्या सहामाहीत एकूण ४३ हजार फ्रेशर्सना कामाची संधी देण्यात आली होती. कंपनीच्या भविष्यातील गरजा ओळखून ही भरती केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुढील सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.

TCS मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी Maths, Statistics, Physics, Chemistry, Electronics, Biochemistry, Computer Science, IT या मध्ये BCA, B.Sc पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.




उमेदवार हे 2020, 2021 आणि 2022 या बॅचेसमधून पास आउट झाले असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संपूर्ण शिक्षणात 5 किंवा 50% पेक्षा जास्त CGPA असणं आवश्यक आहे.

2022 मध्ये पास ऊत होणाऱ्या उमेदवारांना एक बॅकलॉग माफ असणार आहे. मात्र त्या आधीच्या बॅचमधील उमेदवारांचा बॅकलॉग नसावा.

उमेदवारांची संपूर्ण शिक्षणादरम्यानची गॅप ही दोन वर्षांपेक्षा अधिक नसावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2021

परीक्षेची तारीख 19 नोव्हेंबर 2021






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.