खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी
जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा
नागपूर दि. 21 : सणासुदीच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी (https://transport.maharashtra.gov.in/1035/Home) खंडेराव देशमुख यांनी दिला आहे.
प्रादेशिक परिवहन महामंडळातर्फे एसटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसेसही धावत असतात. परंतु त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस पाहता गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाडे राहणार नाही, असे दर शासनाने २०१८ मध्येच निश्चित के ले आहेत. त्यानुसार वातानुकूलीत व अवातानुकूलीत बससाठीचे दर निश्चित केलेले आहे.
खासगी बसधारक प्रवाशाकडून जास्त भाडे वसूल करतात. अशा पध्दतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यास व तपासणी अंती त्या सत्य असल्याचे निदर्शनास आल्यास त्या परवाना धारकाविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
तरीही खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे ज्या ठिकाणाहून खासगी बसेस सुटतात, त्या ठिकाणापासूनचे किलोमीटरप्रमाणे भाडेदराचा तक्ता प्रसिद्ध करावा. तरीही अधिक दर आकारल्यास mvdcomplaint.enff2@gmail.com एमव्हीडी कम्पलेंट डॉट इ एन एफ एफ 2 ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आयडीवर पुराव्यासह तक्रार करता येईल,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर कार्यालयाने कळविले आहे.
https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/RTO%20Address%20marathi.pdf