Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा कालावधीत हेल्पलाईन सुरु





नागपूरदि. 21 : उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी)ची 11 ऑक्टोंबरपर्यंत तर  22  सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत माध्यमिक शालान्त (इयत्ता 10 वी) ची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक परीक्षा व परीक्षेसंबंधी अन्य माहिती मिळण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागपूर विभागीय मंडळाकडून हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे.

            दहावीसाठी संपर्क अधिकारी म्हणून सहायक अधीक्षक श्रीमती अंजली भाईक (9326931344) यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याऐवजी आता विभागीय मंडळाचे संपर्क अधिकारी म्हणून पर्यवेक्षक लिपिक एस. एल. चव्हाण (9423961014) यांची दहावीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन उद्या दिनांक 22 सप्टेंबर, 2021 पासून कार्यान्वित होत आहे.

            नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व  गडचिरोली जिल्ह्यासाठी हेल्प लाईन सेवेसाठी समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

            नागपूर जिल्हा- विशाल गोस्वामी (8275039252), शारदा महाविद्यालय, ओमनगर, वर्धा जिल्हा- पी. के. शेकार(9766917338), यशवंत विद्यालय, सेलू, जि. वर्धा, भंडारा जिल्हा- श्रीमती गायत्री भुसारी (9011062355), समर्थ विद्यालय, लाखनी, जि. भंडारा, गोंदिया जिल्हा - मिलिंद रंगारी (9404860735), जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास संस्था, जि. गोंदिया, चंद्रपूर जिल्हा - सतीश पाटील (9421914353), मातोश्री विद्यालय, तुकूम, जि. चंद्रपूर, गडचिरोली ‍जिल्हा - डी. एम. जवंजाळ (9421817089), रेणुकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली असे समुपदशकांचे संपर्क क्रमांक असून समुपदेशन केंद्र परीक्षापूर्वी एक आठवडा अगोदर तसेच संपूर्ण परीक्षा काळात सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत हेल्पलाईन सेवा कार्यान्वित राहील.

            विद्यार्थी व पालकांनी या हेल्पलाईनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.