Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०२१

पर्यावरणपूरक गौरी गणपतीची सजावट

 ग्रामायण कार्यशाळेत पर्यावरणपूरक गौरी गणपतीची सजावट




Eco-friendly Gauri Ganpati decoration
नागपूर-  गेल्या काही वर्षापासून कुठल्याही सण समारंभाकरिता सजावटीचे साहित्य विकत घेऊन लावण्याची प्रथा सुरु झाली आहे. परंतु, यामध्ये आपण अनावश्यक प्लास्टिक, धातू, थर्मोकोल, पेंटस इतर वस्तू वापरुन लगेच फेकून देतो. हे सर्व पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक आयाम मिळावा तसेच कोरोना काळात मुलांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा, आणि घरच्याघरी उपलब्ध असलेल्या वस्तुंपासून सुंदर सजावट (Eco-friendly Gauri Ganpati decoration) कशी करावी, यासाठी ग्रामायण प्रतिष्ठान तर्फे २ सप्टेंबर २०२१ रोजी एक आभासी कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये सौ. राजश्री तिवस्कर ह्यांनी मार्गदर्शन केले. राजश्री तिवस्कर या मुंडले इंग्लिश स्कूलमध्ये आर्टस् शिक्षिका आहेत. (Rajshree Tivaskar is an arts teacher in Mundle English School) तसेच ३डी ग्लोब या कलाकृती साठी त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यशालेमध्ये त्यांनी घरी उपलब्ध असलेल्या वृत्तपत्र, ज्यूट चे पोते, खर्डा, रंगीत कागद, या पासून सुंदर फुले, पाने, फ्रेम, झुंबर अश्या पर्यावरण पूरक अशा शोभेच्या चार प्रकारच्या वस्तू बनविण्याचे शिकविले. प्रत्यक्ष करूनही दाखविल्या. साध्या २डी ३डी पद्धतीची कमळे पण शिकविली. अतिशय सुंदर वस्तू सहजपणे झालेल्या पाहून सर्वांचा आत्मविश्वास वाढला. एक तासाची ही कार्यशाळा सुमारे दीड तास चालली आणि सर्वांनी त्यामध्ये मनापासून आनंद घेतला.  (Eco-friendly Gauri Ganpati decoration) 

या कार्यशाळेसाठी,  नागपूर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला, वर्धा, गोंदिया, वाशीम, यवतमाळ, अहमदनगर तसेच मुंबईहून महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत १७ पुरुष आणि ३९ महिला अशा एकूण ६६ जणांनी सहभाग घेतला. तसेच यामध्ये ८ वर्षापासून ते ६६ वर्षापर्यंतच्या वयाच्या लोकांनी सहभाग घेतला.


असे ज्ञानवर्धनीय उपक्रम राबविण्यास ग्रामायण प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील असते. सर्व वयोगटाच्या स्त्री-पुरुषांसाठी ग्रामायण तर्फे दरमहा एका विषयावर अशा कार्यशाळेचे आयोजन होत असते. त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील ही पहिली कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक, परिचय व आभार प्रदर्शन  सौ. माधुरी केळापुरे यांनी केले.

 (Eco-friendly Gauri Ganpati decoration) 



For this workshop, women and men from Nagpur, Bhandara, Buldhana, Chandrapur, Akola, Wardha, Gondia, Washim, Yavatmal, Ahmednagar as well as Mumbai participated.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.