Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

घाटंजी तालूक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा



यवतमाळ दि.७
    घाटंजी तालूक्यातील मौजे शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे नवीन रूग्णवाहीकेचे लोकार्पण सौ.सरीता मोहणराव जाधव यांच्या शुभ हस्ते दि.७ सप्टें. रोजी पार पडले, शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे, आदिवासी, बंजारा बहूल समाजातील जनतेसाठी संजीवन ठरणारे  आरोग्य केंद्र आहे, ४० वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राची इमारत अतिशय निकृष्ट दर्जाची जिर्ण झाली असून ही इमारत कधीही कोसळून जिवीत हाणी होवू नये, यासाठी सतत पाठपुरावा करून जि.प. सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्या सौ.सरीताताई मोहनराव जाधव यांनी इमारतीचे निर्लेखनाचे (पाडण्याचे) ठराव पास करून घेतले आहे, तसेच नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी संबंधित मंत्री, C.E.O., D.H.O. शासन यांचेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मत भाजपा व्हीजेएनटी आघाडी, जिल्हाध्यक्ष मोहण जाधव यांनी रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सांगितले, तर याप्रसंगी प्रमुख उपस्थीती म्हणून शिवणी येथील ग्रा.प. सरपंचा सौ.मनीषा अनील मेश्राम, उपसरपंच नरेंद्र चव्हाण, तालूका आरोग्य अधिकारी डॉ.धर्मेश चव्हाण, श्री.अतिशजी देशमुख, मोहनभाऊ राठोड़ घाटूंबा, देवदत्तभाऊ जाधव, तुकारामभाऊ राठोड़, रामधनजी राठोड़ महाराज, सामाजिक कार्यकर्ता विलासराव पवार, प्रा.आ.केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद आयोजित रूग्णवाहीका लोकार्पण सोहळ्यात प्रामुख्याने उपस्थित होते.

Dedication of ambulance at Health Center  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.