Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपातर्फे निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपातर्फे निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड


मनपा प्रशासन सज्ज : अधिकाऱ्यांनी केली गणेश मूर्तींची तपासणी

चंद्रपूर, ता. ८ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे शुक्रवार, ता. १० सप्टेंबर  रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा यासाठी निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी बुधवारी मनपाच्या पथकाने मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानात तपासणी केली. (Chandrapur Municipal Corporation has banned the sale and use of plaster of Paris (PoP) idols during upcoming Ganesh festival.)

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सवावर भर देण्यात आला आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, अथवा मनपा प्रशासनातर्फे झोननिहाय तयार करण्यात आलेले कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश यांचा विसर्जनाकरिता अगत्याने वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी आहे. त्यात पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. याबाबतीत महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात शहरातील सर्व मुर्तीकारांची बैठकही घेण्यात आली होती. या नियमांचे कडेकोट पालन व्हावे, या दृष्टीने पोलीस विभाग, मूर्तीकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक यांचे संयुक्त पथक पाहणी करत आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही पीओपी मूर्ती विक्री, साठा व खरेदी करू नये असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती गणपती मूर्ती २ फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास मनपाच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे, पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.        
Chandrapur Municipal Corporation has banned the sale and use of plaster of Paris (PoP) idols during upcoming Ganesh festival.

मनपाचे कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश ठिकाण

झोन क्रमांक - १
१) मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट नागपूर रोड
२) डॉ. बाबा आमटे अभ्यासिका
३) दाताळा रोड, इरई नदी
४) तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर)
------------------

झोन क्रमांक - २
१) गांधी चौक
२) लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा पठाणपुरा रोड, समाधी वार्ड
३) शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड
४) विठोबा खिडकी, विठ्ठल मंदीर वार्ड
५) रामाळा तलाव
६) हनुमान खिडकी
७) महाकाली प्रा. शाळा, महाकाली वार्ड
------------------
झोन क्रमांक - ३
१) नटराज टाॅकीज (ताडोबा रोड)
२) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ
३) मनपा झोन कार्यालय, मूल रोड
४) बंगाली कॅम्प चौक


Chandrapur is a city and a municipal corporation in Chandrapur district, Maharashtra state, India. It is the district headquarters of Chandrapur district.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.