शिरीष उगे , भद्रावती प्रतिनिधी
-:ग्रामसंवाद सरपंच संघटना व स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने 'कोरोना काळात ग्रामपंचायतींची भुमिका' या विषयावार मार्गदर्शनपर सामाजिक कार्यक्रम मंगळवार दि. १४ ला स्थानिक श्री मंगल कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी शिवपांदण रस्त्यांची आवश्यकता, तांत्रीक अडचणी, त्यावर कायदेशीर मार्गदर्शन याविषयावर जेष्ठ विधिज्ञ पी.एम. सातपुते व विजय मोगरे यांचे सविस्तर मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे, विशेष अतिथी जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब वराटे, तहसिलदार महेश शीतोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, ग्राम संवाद सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस निलेश पुलगमकर, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर, जेष्ट विधिज्ञ ॲड. पुरुषोत्तम सातपुते, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे, जेष्ट विधिज्ञ ॲड. विजय मोगरे, शरद जिवतोडे,ज्ञानेश्वर डूकरे, धनराज आस्वले, कौरासे गुरुजी, आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात गावप्रमुख, शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य तथा महिला बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा. लोकप्रतिनिधींच्या वेळेवरील दौ-यामुळे काही सरपंच उशीरा का होईना मात्र कार्यक्रमात उपस्थित झाले.
ॲड. देवा पाचभाई, सरपंच प्रदिप महाकुलकर, जिल्हा अध्यक्ष रीषभ दुपारे, जिल्हा सचिव प्रशांत कोपुला, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर चटप, सरपंच बंडू पा. नन्नावरे, तालुका अध्यक्ष नयन जांभुळे, मनिषा रोडे, शंकर रासेकर, शरद खामनकर, भावना कुरेकार, विजय खंगार, पोर्णीमा ढोक, मोहित लभाने, निरंजना हनवते, मयूर टोंगे, धनराज पायघन, विलास लेडांगे, अनिल खडके, एकनाथ खागी, अनिल चौधरी, संगीता खीरटकर, भीमराव सांगोळे, पुजा उईके, मुकेश आसकर, मन्गेश भोयर, मनोज तिखट आदींनी कार्यक्रम यशस्वि करण्यास परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सरपंच रत्नाकर चटप तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद घोडे यांनी केले.
असेच उपक्रम या क्षेत्रात ट्रस्ट सतत करीत राहील व जनतेची सेवा सुरु राहील, अशी ग्वाही रवि शिंदे यांनी दिली.