Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १५, २०२१

धक्कादायक!अतिवृष्टीने पिकांचे नुकसान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.


पैठण - तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष आप्पासाहेब भानुदास सातपुते ( वय ४४) यांनी शेतात आलेले पुर्णच पिक जोरदार अतिवृष्टीमुळे वाया जात आसलेले पाव्हुण व घेतलेले कर्ज कसे फेडावे कुटुबाचा उदर निर्वाह कसा करावा या विवंचनेतून बुधवारी सकाळी सहा साडेसहा वाजेदरम्यान गावातील खळवाडी भागातील स्वताच्या शेतात गट न ४३५ मधील चिंचाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना घडली असुन, घरच्यांनी बघितले आसता सकाळी आप्पासाहेब सातपुते हे झाडाला लटकलेला दिसल्याने आरडाओरडा करत गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली घेऊन पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्यास डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.व शवविच्छेदन करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहीते पवन चव्हाण व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.या घटनेची पाचोड पोलिस ठाणेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आप्पासाहेब हा कुटुंबातील सर्वात मोठा होता.
  आत्महत्याग्रस्त आप्पासाहेब सातपुते यांच्या पाश्चात आई एक भाऊ,पत्नी एक विवाहित मुलगी,दोन मुले आसा मोठा परीवार आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेचा पुढील तपास सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहीते, पवन चव्हाण व सहकारी करत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.