Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १०, २०२१

२६ वर्षीय महिलेचा उपसरपंचानी केला विनयभंग

शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
:- तालुक्यातील सागरा येथील २६ वर्षीय महिलेचा विनयभंग उपसरपंच्यानी केल्याची घटना बुधवारला रात्र दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी उपसरपंच्याला अटक करण्यात आली आहे.
शंकर नथ्थू रासेकर वय ४५ वर्षे उपसरपंच राहणार सागरा असे आरोपीचे नाव आहे. हा उपसरपंच तसेच सरपंचाचा सुद्धा कार्यभार याठिकाणी सांभाळत आहे. झालेल्या निवडणुकीत फिर्यादीच्या परिवाराने आपणास निवडणुकीत मदत केली नाही दुसऱ्या गटाला मदत केली याबाबत त्यांच्या मनात राग होता. फिर्यादीच्या भावाला रोजगार नसल्याने गावात चिकन विक्रीचे दुकान लावले होते या रासेकर उपसरपंच्याने गावात चिकन विक्री करायची नाही म्हणून शिवीगाळ करून दुकानाची तोडफोड केली. या घटनेची शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पुन्हा फिर्यादीच्या भावाने गावात चिकन विक्री चे दुकान लावले असल्याचे पाहून उपसरपंच हा फिर्यादीच्या घरी गेला व त्या महिलेला तुझा भाऊ कुठे आहे असे म्हणत शिवीगाळ केली असे म्हटल्यावर तिला सुद्धा शिवीगाळ करत तिच्या घरात घुसला व तिच्या अंगावरील कपडे काढून तिचा विनयभंग केला. ही घटना घडत असताना शेजारी एकत्र आले तेव्हा आरोपी तिथून निघून गेला या घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून आरोपी उपसरपंच्याला अटक करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.