Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १०, २०२१

भेंडी कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त आहे?

 आरोग्याचे 'पाॅवर हाऊस' : भेंडी कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त आहे?

Okra is useful for which ailments?





माणसाला होणाऱ्या आजारांपैकी ५० % आजार हे पोटामुळे होतात. आपले पोट व्यवस्थित असेल तर आपले आरोग्य नीट राहू शकते. आणी पोट व्यवस्थित ठेवण्याचे काम 'भेंडी' ही भाजी चांगल्या प्रकारे करते. पोटाचे आजार, बद्धकोष्ठ, एसीडीटी यावर भेंडी आठवड्यातून खाणे हा उत्तम उपाय आहे.

इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डाॅ सिल्व्हीया झुक यांनी भेंडीच्या भाजीविषयी असे सांगीतले आहे की, भेंडीची भाजी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक अन्नद्रव्यांचे 'पाॅवर हाऊस ' आहे. भेंडीतील अर्धा भाग हा गम व पेक्टीनच्या धाग्यांच्या स्वरूपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच ह्रदयविकार कमी होतो. भेंडीतील अतीद्राव्य तंतूमय चोथा हा शरीरातील पचनेंद्रीयांचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो.


भेंडी खाल्ली तर आतड्याचा कॅन्सर बरा होतो तसेच रक्तातील हाय शुगर कमी होते. भेंडीमध्ये असलेल्या पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते त्यामुळेच रक्तातील वाढणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी होते.


भेंडीच्या भाजीत बी-६ हे जीवनसत्व तसेच शरीराला उपयुक्त असे फाॅलीक आम्ल मुबलक असते.


भेंडीमध्ये असलेली रसायने यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता कमी करतो. तसेच आपल्या शरीराला उपयुक्त अशा जीवाणूंच्या वाढीस हि भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालवण्यासाठी हि भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुसातील संसर्ग, गळ्याचे आजार, गळ्यातील खाज यावर भेंडीची भाजी खुपच उपयुक्त आहे.


मात्र हे सर्व लाभ घेण्यासाठी भेंडीची भाजी कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली खावी.

भेंडीच्या भाजीचे फायदे-

१) भेंडीच्या भाजीत अनेक पोषक तत्वे आणी प्रोटिन्स असतात. शरीराला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाईड्रेट, कॅल्शियम, फाॅस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणी सोडीयम यासारखी जीवनसत्वे आहेत.

२) भेंडी आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये नष्ट करून बाहेर टाकते.

३) भेंडी हि कॅन्सर च्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे. विशेषतः आतड्याच्या कॅन्सरवर खुपच उपयुक्त आहे.

४) भेंडीत असलेल्या युगोनाॅल मुळे डायबेटिस/मधुमेह/ शुगर या आजारावर भेंडी खुपच उपयुक्त आहे. तसेच यातील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

शुगरसाठी औषध- हा उपाय करण्यापुर्वी तुमची साखर चेक करा. त्यानंतर दोन भेंड्या घ्या. त्यांचे दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद द्या. एक ग्लास भरून पाण्यात त्या दोन्ही भेंड्या रात्रभर भिजत ठेवा. ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर ग्लास मधील भेंड्या काढून टाका आणी ग्लास मधील पाणी पिऊन टाका. दररोज उपाशीपोटी हे पाणी पिल्या नंतर एक महीन्यांनी साखर चेक करा. रक्तातील साखरेच्या प्रमाणात किती घट होतेय याचा तुम्हीच अनुभव घ्या.

५) भेंडी खाल्ल्याने आपले वजन कमी होते. त्यामुळेच ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी कायम भेंडी खावी. कारण भेंडीत असलेल्या फायबरमुळे शरीरातील कॅलरी वाढत नाही. आणी वजन कमी होते.

६) भेंडी हि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात असलेले व्हिटॅमीन सी हे जीवनसत्व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

७) ह्रदयरोग कमी होतो. भेंडी हि ह्रदयाला मजबूत करून निरोगी ठेवते. भेंडीतील पैक्टीन हा घटक रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतो.

८) अनिमिया वर रामबाण औषध. भेंडीतील आयरन हे रक्तातील हिमोग्लोबीन निर्माण करते. अनेक तरुण मुली व महीला यांच्यात हिमोग्लोबीन कमी असते त्यावर भेंडी खुपच उपयुक्त आहे. त्यामुळेच भेंडीला लेडी फिंगर असे म्हटले जाते.

९) भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमीन के हे आपल्या शरीरातील हाडांना मजबूत करते.

१०) इम्युन सिस्टीम- भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले व्हिटॅमीन सी आणी एन्टीऑक्सीडेंट हे आपल्या शरीरातील इम्युन सिस्टीमला मजबूत करतात. त्यामुळेच आपले शरीर विविध आजारांशी लढते.


११) मोतीबिंदू, डोळ्यांचे आजार यावर उपयुक्त- नेत्रहिनता व डोळ्यांच्या आजारासाठी जे कण हानिकारक असतात, त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते.


१२) गर्भावस्थेमध्ये महीलांनी भेंडी खाणे फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल हे पोषक तत्व असते. जे पोटातील बाळाच्या मेंदूचा विकास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते.

१३) भेंडीमुळे वजन कमी होते.

१४) भेंडी त्वचेला तरूण व तजेलदार ठेवते.

१५) केसांसाठी उपयुक्त- भेंडीच्या आतील गर आणी लिंबूचा रस एकत्र करून केसांना लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर धुवून टाका. एक महीनाभर दररोज असे केल्यास, केस गळणे थांबुन केस चमकदार, काळे, घनदाट व सुंदर होतात.



Reduces heart disease. Okra strengthens the heart and keeps it healthy. Pectin in okra lowers blood cholesterol.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.