Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ३०, २०२१

नागपूर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर | ही यादी


 

 नागपूर दि. 30 : संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे गठण पालकमंत्री  डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्र व तालुकानिहाय समितीचे गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती पूर्व नागपूर- विधानसभा क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी शेख अय्याज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिव नायब तहसिलदार असतील. शासकीय सदस्य प्रभाग अधिकारी असतील. यामध्ये नियुक्त केलेल्या अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अशासकीय सदस्य विनोद मंडपे, महिला सदस्य अलका दलाल, इतर मागावर्गीय/विजाभज सदस्य म्हणून अंगद हिरोंदे, सर्वसाधारण सदस्य रविंद्र इटकेलवार, दिव्यांग सदस्य अमित पटेल, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्य अंकुश भोवते, सामाजिक क्षेत्राचे कार्यकर्त्या अशासकीय सदस्य मायाताई गजभिये, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य लक्ष्मण वाडबुधे आहेत.

उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी दिपक खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे सदस्य तहसिलदार किंवा नायब तहसिलदार असतील शासकीय सदस्य प्रभाग अधिकारी असतील. यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अशासकीय सदस्य कुंडलिक मेश्राम, महिला सदस्य कल्पना द्रोणकर, मागासवर्गीय/विजाभज सदस्य म्हणून मिना एडापारा, शालिनी धोटे, सर्वसाधारण सदस्य अमर दयानी, दिव्यांग सदस्य हफिज अंसारी, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्य संजय सहारे, सामाजिक क्षेत्राचे कार्यकर्त्या कल्पना कटरे, ज्येष्ठ नागरिक गटातून शहाबुद्दीन आहेत.

दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष सुहास रमेश नानवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य निलेश चंद्रीकापुरे, महिला सदस्य विणा बेलगे, इतर मागासवर्गीय/विजाभज रमेश काकडे, सर्वसाधारण सदस्यांमध्ये नारायण निखारे, रामु घाडगे, दिव्यांग सदस्य राहुल लेकुरवाळे, शासन नोंदणीकृत स्वयंसेस्वी संस्थेच्या अशासकीय सदस्य देवेंद्र नागपूरे, सामाजिक क्षेत्रात काम करणारा अशासकीय सदस्य नियामत खान काजी, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य महेबूब खान सत्तार खान पठाण आहेत.

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात स्थापन करण्यात आलेले व पालकमंत्री यांनी शिफारस केल्यानुसार संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती व समितीचे अध्यक्ष जुल्फेकार अहमद भुट्टो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य संघपाल गाणार, महिला सदस्य वैशाली उदापुरे, इतर मागासवर्गीय/विजाभज रवी पराते, श्रावण खापरेकर, सर्वसाधारण सदस्यांमध्ये सागर चव्हाण, दिव्यांग सदस्य भरत शर्मा, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्या रोशनी निखारे, सामाजिक क्षेत्रात काम करणारा अशासकीय सदस्य आशिष कटारे, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य प्यारुद्दीन अलफुद्दीन काजी आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती पारशिवनी तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष दिपक शिवरकर, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य प्रेम भोंडेकर, महिला सदस्य रोहिणी निंबाळकर, इतर मागासवर्गीय/विजाभज भिमराव कळमकर, दिनेश आदेवार, सर्वसाधारण सदस्यांमध्ये मंगेश बालगोटे, दिव्यांग सदस्य  गोपाल केळवदे, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य गजानन गजभिये, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य निकेश भोयर आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती कामठी तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष प्रमोद खोब्रागडे, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य विजय पाटील, महिला सदस्य कुसुम खोब्रागडे, इतर मागासवर्गीय/विजाभज सदस्य प्रभाकर मोहोड, सुभाष धुळसे, सर्वसाधारण सदस्यांमध्ये दिनेश ढोले, दिव्यांग सदस्य देविदास वैद्य, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्य रमय्या कोतपल्लीवार, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा अशासकीय सदस्य सलामत अली आरीफ अली, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य मोरेश्वर गायधने आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती  रामटेक तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष विवेक तुरक, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य सागर प्रतिराम लोंढे, महिला सदस्य सुंदरबाई खडसे, इतर मागासवर्गीय/विजाभज कंचन रोहीत टाटी, धर्मराज राहाटे, सर्वसाधारण सदस्यांमध्ये देवानंद वंजारी, दिव्यांग सदस्य विजय रामेलवार, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्य डॉ. नितीन विरुळकर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अशासकीय सदस्य गजानन ढोरे, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य सचिन हरपालसिंग खागर आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती भिवापूर तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष बाळु इंगोले, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य संजय नथ्थुजी गजभिये, महिला सदस्य छाया ढोणे, इतर मागासवर्गीय/विजाभज चंद्रशेखर ढाकुणकर, सर्वसाधारण सदस्यांमध्ये संजय देशमुख, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचे अशासकीय सदस्य प्रमोद लांजेवार, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य शिरीष गुप्ता आहेत. पालकमंत्री महोदयांकडून भिवापूर तालुक्यासाठी इमाव/विजाभज सदस्य व सामाजिक क्षेत्रातील सदस्य यांच्यासाठी नावाची शिफारस केली नसल्यामुळे पवन राऊत व दिनेश लांबट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती  कुही तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष सुनिल किंदर्ले, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य विनय गजभिये, महिला सदस्य प्रेमिला जिभकाटे, इतर मागासवर्गीय/विजाभज परमानंद शेंडे, सर्वसाधारण सदस्यांमध्ये जितेंद्र मांढरे, दिव्यांग सदस्य देविदास धरगावे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अशासकीय सदस्य लिलाधन नंदनवार, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य गणेश दुधपचारे आहेत. जिवनलाल डोंगरे व लिलाधर धनविजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती उमरेड तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य राहुल बारापात्रे, महिला सदस्य माधुरी देशमुख, इतर मागासवर्गीय/विजाभज सुधाकर गाडबैल, सर्वसाधारण सदस्यांमध्ये यादव भोयर, दिव्यांग सदस्य प्रशांत भगत, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्य डॉ. नितीन विरुळकर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा अशासकीय सदस्य शिवदास कुकुडकर, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य सुभाष नान्हे आहेत. लक्ष्मणराव डोकरमारे व विलास कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती  मौदा तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेले समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, अन्य सदस्यांमध्ये मागासवर्गीय अजा/अज अशासकीय सदस्य आशिष पाटील, महिला सदस्य संगिता जौंजाळकर, इतर मागासवर्गीय/विजाभज सावित्री काटकर, विनायक महादुले, सर्वसाधारण सदस्यांमध्ये रामनरेश सेनवार, दिव्यांग सदस्य प्रभु हटवार, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या अशासकीय सदस्य प्रशांत भुरे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा अशासकीय सदस्य संदिप आंबिलडुके, ज्येष्ठ नागरिक अशासकीय सदस्य अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात येत आहेत.



पेज नेव्हिगेशन




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.