Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ३०, २०२१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना | 11वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये

 


1) ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे,ज्याने 2020-2021च्या *10वीच्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण* मिळवले असतील. विद्यार्थी कोणत्याही विद्याशाखेत प्रवेश घेऊ शकतो *कला, विज्ञान,वाणिज्य अथवा इतर.* 11 वी प्रवेश घेऊन शाळेच्या प्राचार्यांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक.


2) ही योजना *दारिद्र रेषेखालील अथवा अडीच लाख रुपये* वार्षीक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.


3) या योजनेचा पहिला हप्ता 50 हजार रुपये असेल व नंतरचे 3 हप्त्यांसाठी 11वी व 12 वी च्या सहामाही व वार्षिक परीक्षेत 75% गुण असणे आवश्यक आहे.


4) या योजनेचा फॉर्म https://barti.in/notice-board.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  हा फॉर्म डाऊनलोड करून  सर्व महत्त्वाची माहिती भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी २८, राणीचा,पुणे  बाग ४११००१ , या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.