टपाल विमा योजनेअंतर्गत विमा प्रतिनिधींची थेट मुलाखत
Ø इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 30 जुलै: टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल विमा योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक डाकघर चांदा विभागाचे अधीक्षक यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन चांदा विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
मुलाखतीस आवश्यक कागदपत्रे:
ईच्छुक उमेदवांरानी मुलाखतीस येतांना अधीक्षक डाकघर यांच्या नावाने केलेला लेखी अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व अन्य आवश्यक दस्तावेज तसेच त्यांच्या छायांकित प्रतीसह उपस्थित रहावे.
पात्रतेच्या अटी:
उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे, उमेदवार दहावी पास असावा, इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (मार्केटिंग स्किल्स), संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.
बेरोजगार तरुण-तरुणी, स्वयंरोजगार करणारे महिला व पुरुष, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन,प्रोत्साहन भत्ते दिल्या जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परीक्षा फी रु.400 आणि परवाना फी रुपये 50 जमा करावे लागतील. निवड झालेल्या उमेदवारांना रुपये 5 हजार राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्रामध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील.
या ठिकाणी रहावे उपस्थित:
इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता अधीक्षक डाकघर चांदा विभाग, मुख्य डाक घर बिल्डिंग, तिसरा मजला, चंद्रपूर येथे दि.2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लेखी अर्ज व दिलेल्या आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे.