Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ३०, २०२१

चंद्रपूर मनपात रंगणार सभापतीपदाचा सामना | Chandrapur CMC

 पाच ऑगस्ट रोजी मनपाच्या झोन सभापतींची निवड  


मागील एप्रिल महिन्यात इंदिरानगर झोनचे सभापती अंकुश सावसाकडे यांचे निधन झाले. तेव्हापासून ती जागा रिक्त आहे. उर्वरीत इतर झोनमध्ये संगीता खांडेकर आणि राहुल घोटेकर विद्यमान सभापती असून, त्यांचा कार्यकाळ संपत आहे. 


 


चंद्रपूर, ता. ३० : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतीपदासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी निवड होत आहे. मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ अ-(४) अन्वये विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर चे पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०५/२०२१ दि. २६ जुलै २०२१ अन्वये २०२१-२२ साठी  चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीन मधील सदस्यांतून प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी ऑनलाईन विशेष सभा ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा होत आहे. सभापती निवडीसाठी कोरे नामनिर्देशन पत्र दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात उपलब्ध राहतील. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. पाच ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी ऑनलाईन विशेष सभा सुरु झाल्यावर होईल. छाननीनंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर त्याच दिवशी आवश्यकता भासल्यास मतदान होईल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.