खासदार बाळू धानोरकरांच्या प्रश्नावर ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे उत्तर
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार, विदर्भातील बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार केलेल्या रस्त्यांचा राज्यवार लांबीसह तपशील, रस्त्याच्या प्रत्येक घटकासाठी मंजूर आणि जाहीर केलेल्या एकूण रकमेचा तपशील आणि रस्ते पूर्ण होण्याच्या स्थिती आणि राज्यातील आगामी प्रकल्पासाठी नियोजित / मंजूर / प्रस्तावित रस्त्यांचा तपशील आदी माहिती धानोरकर यांनी विचारली होती.
पीएमजीएसवायच्या अंलबजावणीसाठी राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना मंत्रालयाने दिलेला निधी उर्वरित काम, उर्वरित शिल्लक आणि खर्चाची गती लक्षात घेऊन केले जाते. १५ जुलै पर्यंत पीएमजीएसवाय अंतर्गत राज्य / केंद्रशासित प्रदेशांत केंद्रीय हिस्सा म्हणून २,१३,७१४ कोटी रुपये इतकी रक्कम जाहीर करण्यात आली असून २,५४,२८१ खर्च झाला आहे. असे उत्तरात नमूद केले आहे.
पीएमजीएसवाय हि एक सातत्यपूर्ण योजना आहे. पीएमजीएसवाय -१ आणि पीएमजीएसवाय ३ सर्व कामे मंजूर झाली असून एकूण ९,२६८ किमी आरसीपीएलडब्ल्यूईए अंतर्गत आहेत. ४,१२५ किमी लांबीचे रस्ते पूर्ण झालेत. २,०२४ किमी रस्त्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पीएमजीएसवाय ३ अंतर्गत एकूण लक्ष्य १,२५,००० किलोमीटर आहे. आणि ६२,९६८ किमी मंजूर झाले आहे. पीएमजीएसवाय ३ पूर्ण होण्याची अंतिम मुदत मार्च २०२५ पर्यत आहे, असेही साध्वी निरंजन ज्योती यांनी नमूद केले.