Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून २२, २०२१

चंद्रपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी विपीन मुद्दा



Vipin Mudda as Additional Commissioner of Chandrapur Municipal Corporation

वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी 18 जून 2021 ला यासंदर्भात आदेश जारी केले. बुधवारी पदभार घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

बल्लारपूर नगर परिषदेत जवळपास ५ वर्ष मुख्याधिकारी पदी होते. त्यानंतर गडचरोली येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, नगर विकास विभागाचा दिनांक ११ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेश परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यानचे बदल्याचे विनियमन आणि नगर परिषद मुख्याधिकारी गट अ संवर्ग तील सदर्भाधीन आदेशानुसार शासनाच्या आदेशानव्ये अंशतः बदल करून वर्धा येथील विद्यमान मुख्याधिकारी असलेले श्री. जगताप यांचे ठिकाणी गडचिरोली येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. विपीन मुद्दा यांची बदली करण्यात होती.  
मागील 10 महिन्यांपूर्वी विपीन मुद्दा यांनी वर्धेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. यांच्या कार्यकाळात वर्धा शहरात अनेक विकासात्मक कामे झाली. ज्यात वर्धा नगर परिषदेची प्रशस्त इमारत निर्माण, जनतेच्या सहकार्यातून स्वच्छ व सूंदर वर्धा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले.

 तत्पूर्वी बल्लारपूर नगर परिषदेत जनतेच्या सहकार्यातून अनेक उपक्रम राबविली होती. स्वच्छ बल्लारपूर, सुंदर बल्लारपूर संकल्पना राबवून राज्यस्तरावर पारितोषिकही त्यांच्या काळात बल्लारपूर नगर परिषदेला मिळाले होते. 

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नगर परिषद क्षेत्र असलेल्‍या तसेच मिनी भारत अशी ओळख असलेल्‍या बल्‍लारपूर शहराला केंद्र शासनाच्‍या नगरविकास मंत्रालयाने थ्री स्‍टार दर्जा (कचरा मुक्‍त शहर) देण्‍यात आला होता. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री. विपीन मुद्दा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.