“शाळेबाहेरची शाळा”
मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर, नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि जि. प. नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवित आहोत. हा कार्यक्रम दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला घेऊन येत आहे.
“शाळेबाहेरची शाळा” (भाग 160) हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर उद्या गुरुवार सकाळी 10:35 वा. आकाशवाणीच्या नागपूर 'अ' (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
तेव्हा सर्वांनी ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका .
कार्यक्रम ऐकण्यासाठी 'प्रथम महाराष्ट्र' या अँप च्या माध्यमातून मागील भाग ऐकण्यासाठी 'शाळेबाहेरची शाळा' हा टॅब निवडावा आणि थेट प्रसारण ऐकण्यासाठी ‘थेट रेडीओ प्रक्षेपण’ हा टॅब निवडावा. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे
https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra
#Digital #Media #Education #pratham #maharashtra #khabarbat #news