Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०८, २०२१

घुग्घुस शहरात राजीव रतन रुग्णालय कोविड-१९ रुग्णाकरिता वरदान

 घुग्घुस शहरात राजीव रतन रुग्णालय कोविड-१९ रुग्णाकरिता वरदान 

ऑक्सिजन करिता वाढीव यंत्रणेची गरज- ब्रिजभूषण पाझारे 



घुग्घुस : महामारी कोरोना परिस्थितीत घुग्घुस शहरासाठी वरदान ठरलेल्या वेकोली चे राजीव रतन रुग्णालयाची सध्या ओळख झालेली आहे. येथील आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व इतर सेवक दिवसरात्र रुग्णाच्या सेवेत कर्तव्य बजावीत आहे.  घुग्घुस येथे मोठ्या प्रमाणात वेकोलि परिसर आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात घुग्घुस व वेकोलिच्या लोकवस्तीत दिसून येत आहे.  सध्या राजीव रतन रुग्णालयात येथे २८ ऑक्सिजन बेड तर व २८ साधे बेड्स उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत येत्या काही दिवसात १५  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १५   पूर्ण क्षमतेचे  व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन प्लॉट लवकरात लवकर उपलब्ध करण्याची गरज आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO ने निर्देश दिले आहे.  त्यामुळे भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता वेकोली मार्फत नियोजन करण्याची आवश्यकता आहे. 

                 आज माजी समाजकल्याण सभापती तथा जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी राजीव रतन वैदकीय अधीक्षक  डॉ. आनंदे  यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता याठिकाणी ऑक्सिजन कमी पडत असल्याचे  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित वेकोली महाप्रबंधक व जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली.    

 राजीव रतन रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक  डॉ. आनंदे वैद्यकीयपदाचे कर्तव्य बजावीत कोरोना रुग्णाच्या सेवेत रात्रदिवस कार्य करिता आहे. राजीव रतन रुग्नालयातील  डॉ.चौधरी व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असणारे १०० आरोग्य सेवक व सहाय्यक कर्तव्य बजावीत आहे. तसेच कोविड उपचार केंद्रउभारण्यास नेहमी अग्रस्थानी असणारे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीरभाऊ मूनगंटीवार, माजी केंद्रीय गृह मंत्री हंसराजभैय्या अहिर व वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे साहेब यांचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.