महामारीची तिसरी लाट येण्याआधीच नियोजन करावे.- ब्रिजभूषण पाझारे
सद्या स्थितीत होत असलेल्या विषाणूचा संसर्ग पाहता राज्यात कोरोनाची तिसरी लाट अटल असल्याच्या इशारा सल्लागार तज्ञांनी दिला आहे. त्यात चंद्रपूर शहर काही वेगळे नाही. आज चंद्रपूर शहरात दिवसाला चार अंकी चा आकडेवाडीत रुग्णाची संख्या दिसून येत आहे. अटल असणाऱ्या या लाटेला महामारीची लाट हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. आणि या लाटेचा वार लहान बालकांना होणार असून त्यांचा जीवाला मोठा धोका उत्पन्न करणारा देखील असू शकणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील प्रशासनाने यावर पूर्व नियोजन करावे व भविष्यात होणार संभाव्य भयंकर परिस्थितीला आळा घालावा. त्याप्रमाणे चंद्रपूर शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ५० व्हेंटीलेटर उपलब्ध करण्याबाबत माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केलेली आहे.
यासोबतच पाझारे यांनी जिल्हातील कोविड उपचार केंद्रात वाढीव बेड, ऑक्सिजन सिलेंडर, फ्लो-मीटर, व्हेंटीलेटर व इतर औषधी साठा यांची वाढ करण्यात यावा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याबाबत प्रशासनाला विनंती केली आहे.