आपत्कालीन रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक
२५ लिटर मोहफुलाची दारू,रूग्णवाहिकेसह
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लॉकडाऊन लावल्यामुळे व्यवसाय,कार्यालय बंद असून त्यात दारूचे दुकानही बंद असल्याने मद्यपीना आपले व्यसनाची पूर्तता करतांना तारांबल उडत आहे.याच संधीचा फायदा घेत अवैध दारू धंद्याला उधाण आले असून रुग्णवाहीकेत रुग्ण न नेता चक्क दारू नेल्या जात आहे.
प्राप्त पोलीस सूत्राच्या माहीती नुसार आरोपी रुग्णवाहिका चालक सचिन दिलीप धावडे वय 27 वर्ष राहणार माधव नगरी एमआयडीसी हा गाडी क्रमांक एम. एच.-31सी क्यू- 8499 या रुग्णवाहिकेनी शुक्रवार 7 मे रोजी मध्यरात्री 1.30 वाजताचे दरम्यान अमरावती राष्ट्रीय महामार्गाने वडधामना येथून मोहफुलाची वाहतूक करीत होता.याच दरम्यान वाडी पोलीस गस्तीवर असतांना रुग्णवाहिकेचे सायरन न वाजवीत येत असताना पोलीस दिसताच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सायरन सुरू केल्याने पोलिसांना संशय आला रुग्णवाहिका थांबवून चौकशी केली असता एकही रुग्ण नव्हता तरीही सायरन का वाजविला याबाबत कसून चौकशी केली असताना गाडीतून मोहफुलाच्या दारूचा वास येऊ लागला लगेच गाडीची झडती केली असता 25 लिटर मोहफुलाची दारू अंदाजे किंमत 2 हजार 500 रुपये,1 लाख 50 हजाराचे वाहन असा एकूण 1 लाख 52 हजार 500 रुपयांच्या मुद्धेमालसह आरोपीला ताब्यात घेतले.सदर माल आयसी चौक मधील निवासी भोला प्रदान याचा असल्याची माहिती पुढे आली आहे.वाडी पोलिसांनी महा प्रो ऍक्ट कलम 65 नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करून वाडी पोलीस ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पुढील तपास करीत आहे.