दि. १७ मे २०२१
आज कोरोना व्हायरसची महामारी आपल्या महाराष्ट्र तच नव्हे तर इतर देशातही झपाट्याने पसरली आहे. यातच किती तरी तरुण युवा पीढी बेरोजगार झालेली दिसुन येत आहे. अनेक मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालेला आहे. जे मूल/मुली शाळेत जावुन शिक्षण घ्यायचे काही तरी चांगले गुण अंगी आणायचे तेच लहान लहान मूल आज शिक्षणा पासुन दुर जावू लागले आहेत. आज पूर्ण तरुण वर्ग बेरोजगार होवुन घरी बसलेले आहेत. काही तरुण तर वाईट मार्गला देखील लागले आहे. काही तरुणानां वाईट व्यसन असतात, आज त्या तरुणांचे ते शौक पूर्ण करायला पैसे नसल्यामुळे ते तरुणमुलं वाईट मार्गाला लागलेले दिसुन येत आहेत. आत्ताचे २० ते ३० वायोगटातिल मूल घरफोडी करायला लागली आहे. काही युवकांचा रोजगार हिरावुन गेल्याने ते युवक मटका, जुगार, क्रिकेट वर पैसे लावुन सट्टा खेळत आहेत. जिंकलेत तर ठीक नाहीं तर दुस-याला उधार मागुन पुन्हा खेळत आहेत व कर्जबाजारी होत आहेत. आणि कर्जबजारी झाले की घरच्यांना त्रास देणे, दारू पिऊन घरी झगडे करुन आई वडिलांना धमक्या देणे, मारहाण करणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. घरच्यानी जर पैसे दिले नाही तर, चोरी करने, पैशासाठी लोकांचा खुन करणे अशा प्रकारच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. आज बेरोजगारीमुळे कितितरी लोक आत्महत्या करू लागले आहेत कारण कोनावर बंकेचे लोन आहे, कोणाला गाडीची किस्त भरायची आहे, कोणाला घर किराया द्यायच आहे, अशा किती तरी गोष्टिचा मानसिक त्रास बेरोजगार युवकांवरील होत आहे. याचे कारण म्हणजे लॉकडॉउन या सर्व समस्यामुळे लोकांचे मानसिकता बिगडली आहे. आणि लोक आपल्या परिवारांच्या गरजा पूर्ण न करू शकल्यामुळे आत्महत्ये चा मार्ग अवलंबत आहेत. आज आपल्या महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहता लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. पण, जे लोक बेरोजगारी ने मरत आहेत आणि वाईट मार्गाला जात आहे त्याचे काय ? असा प्रश्न पुढे येत आहे.
प्रफुल प्रकाश पौनिकर
युवा समाजसेवक
माे. 9372134572