कोरोना कधीही काढू शकतोय डोकेवर
नागपूर : कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असली तरी धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे कोणीही गाफिल राहू नये, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, जळगाव शहरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत आहे. ही बाब दिलासादायक आहे. तरीही, तिसरी लाठ कधीही येऊ शकते. पहिल्या लाठेत वृद्ध, दुसऱ्या लाठेत युवकांना आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोनाने हाहाकार केलाय. तर, तिसरी लाठ आल्यास लहान मुलांना धोका असल्याचा इशारा तज्ज्ञ देतात. तिसरी लाठ येणार किंवा नाही आणि ती खरंच लहान मुलांवर आक्रमण करेल का?यावर तज्ज्ञ 'वेट अँड वॉच'चा सल्ला देत आहेत. मात्र, वृद्ध आणि युवकांना लागण झाल्याने आता लहान मुलांसाठी धोक्याची घंटा असू शकते.
लहानग्यांसाठी हवे लसीकरण
18 ते 44 आणि 45 हुन अधिक वयासाठी लस उपलब्ध आहे. पण, तिसऱ्या लाठेत लहान मुलं प्रभावित झाल्यास लस उपलब्ध कशी होणार? आणि तातडीने कशी देणार? हा प्रश्नच आहे. लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविल्यास या लाठेचा प्रभाव ओसरू शकतो.