Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०७, २०२१

चंद्रपूर:हिलींग टच मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाला लागणार कुलूप






नियमाांची पूूूूर्तता न करता 
उघङले कोरोना उपचाराचे दुकान


चंद्रपूर/ खबरबात:
अटी व शर्तीची पुर्तता न करताच चिमूर येथे हिलींग टच मल्टीस्पेशालिटी रूग्णालय,( कांपा रोड, वडाला ( पैकू ) , ता.चिमुर) सुरू करण्यात आल्याचा प्रकार उघङ झाला आहे.

रूग्णालयास डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ( DCHC ) म्हणून कार्यान्वित करण्यास आदेशातील पूर्तता केल्यावरच मान्यता मिळेल, असे नमुद करण्यात आले असताना देखील नियमांचे उल्लंघन करण्यात आले.त्यामुळे या रुग्णालयाची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली आहे. दिनांक 06 मे , 2021 रोजीपासून कोणत्याही नवीन कोविड -19 बाधित रूग्णास या रुग्णालयात भरती करता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( Covid - 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग अधिनियम 1897 , दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करून खंड 2,3 व 4 मधील तरतुर्दीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे . त्यान्वये जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड -19 वर नियंत्रण आणण्यासाठी व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

हिलींग टच मल्टीस्पेशालिटी रूग्णालय , कांपा रोड , वडाला ( पैकू ) , ता.चिमुर . जि.चंद्रपूर या रूग्णालयास डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ( DCHC ) म्हणून कार्यान्वित करण्यास संदर्भ क्र . 1 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीची पुर्तता केल्यावरच मान्यता मिळेल असे नमुद करण्यात आले होते . तरी या रुग्णालयात अटी व शर्तीची पुर्तता न करताच डेडिकेटेड कोविड रूग्णालय कार्यान्वित केल्याचे निदर्शनास आले आहे . तरी संदर्भ क्र . 2 अन्वये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रस्तावित केल्यानूसार आपल्या रूग्णासयात कोविड -19 बाधित रूग्णांच्या उपचाराबाबत गैरव्यवस्थापन व डेडिकेटेड रूग्णालयाकरीता नमुद आवश्यक अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे . म्हणून जिल्हा प्रशासनाकडून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ( DCHC ) म्हणून देण्यात आलेली मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली , दिनांक 06 मे , 2021 रोजीपासून कोणत्याही नवीन कोविड -19 बाधित रूग्णास आपल्या रूग्णालयात भरती करू नये . सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणाविरूध्द साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.