डुग्गीपार पोलिसांनी 30 वर्षापूर्वीचा मुद्देमाल केला वारसदारांच्या स्वाधीन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.16 मे:-
सडक अर्जुनी तालुक्यातील सीतेपार येथील रहिवासी 1991 वर्षी फिर्यादी नामे फुलनबाई गेंदलाल मडावी यांचे तक्रारीवरून दाखल असलेला गुन्हा क्रमांक 63 / 91 कलम 380 भादवि मधील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले जप्त 40 सोन्याच्या मनीची एकदाणी ही निकाला अंती
पोलीस स्टेशन डुगीपार येथे बोलावून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर तसेच जालिंदर नालकूल उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सचिन वांगडे यांचे हस्ते न्यायालयीन सूचनेनुसार कायदेशीर रित्या पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे 40 नग सोन्याचे मनीची एकदानि ताब्यात देण्यात आली.
विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे निर्देशानुसार प्रलंबित मुद्देमाल निर्गतीची विशेष मोहीम राबवून आपले पो.स्टे.ला असलेले किमती मुद्दे मालाची निर्गती करण्याबाबत सूचना दिल्याने पोलीस स्टेशन डुगीपार येथील रेकॉर्डची तपासणी केली असता पो.स्टे.ला सन 1991 वर्षी फिर्यादी नामे फुलनबाई गेंदलाल मडावी रा. सितेपार यांचे तक्रारीवरून दाखल असलेला गुन्हा क्रमांक 63 / 91 कलम 380 भादवि मधील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले जप्त 40 सोन्याच्या मनीची एकदाणी ही निकाला अंती पोलीस स्टेशन डुगीपार येथे मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित होते. ठाणेदार सचिन वांगडे यांनी सदर मुद्देमाल प्रलंबित असल्याचे कारण पाहून व जुने अभिलेख तपासून शहानिशा केली असता गुन्हा निकाली निघालेला असून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादी यांनी परत नेला नसल्याने सदर माल पोलीस स्टेशन डुगीपार येथे प्रलंबित होता .सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचा शोध घेतला असता फिर्यादी ही 20-25 वर्षापूर्वी मरण पावले असून फिर्यादीचे वारसदार नातू नामे बाळकृष्ण सिताराम मडावी रा. सितेपार हे असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन डुगीपार येथे बोलावून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर तसेच जालिंदर नालकूल उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सचिन वांगडे यांचे हस्ते न्यायालयीन सूचनेनुसार कायदेशीर रित्या पोलीस स्टेशन येथे 40 नग सोन्याचे मनीची एकदानि ताब्यात देण्यात आली. सदर कारवाई हे मुद्देमाल लेखनीक पोलीस हवालदार चौधरी, पो.ह.रामटेके, पोलिस शिपाई भोयर यांनी केली.