नवेगावबांध येथे आठवडी बाजारासह,सर्व दुकाने,व्यापारी प्रतिष्ठाने बंद
नवेगावबांध येथे शंभर टक्के कडकडीत लॉक डाऊन.
सर्वत्र होता शुकशुकाट.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.1 एप्रिल:-
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी विना मास्क, पाच व्यक्तीं पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी केलेली असल्यामुळे
येथील ग्रामपंचायत तसेच ग्राम कोरोना समितीने केलेल्या आवाहनानुसार आज गुरुवार 1 एप्रिल येथील अत्यावश्यक सेवेत मोडणारे व्यवसाय सोडून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने 100% कडकडीत बंद होते.
अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी भ्रमणध्वनीवरून येथील कोरोना समिती अध्यक्ष तथा सरपंच अनिरुद्ध शहारे यांना 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आठवडी बाजार बंद करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार 31 मार्चला स्थानिक कोरोना समितीने बैठक आयोजित केली होती. त्यानुसार गावातील दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याचा तसेच गावातील सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठान गुरुवारला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज एक एप्रिल आर्थिक वर्ष असल्यामुळे गावातील सर्व बँका बंद होत्या. तर शासकीय कार्यालय, औषधी दुकाने, दवाखाने ह्या अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. दर आठवड्याला गुरुवारी भरणारा आठवडी बाजार देखील पूर्णतः बंद होता. एरवी गर्दीने गजबजलेले बस स्टँड, आठवडी बाजार, आझाद चौक येथील सर्व दुकाने बंद होते. रस्त्यावर देखील सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. सर्व रस्ते निर्मनुष्य होते.या एक दिवसाच्या लॉकडाउन मध्ये नवेगावबांध ग्रामस्थांनी देखील 100% सहभाग दर्शविला. आज आठवडी बाजार व गावातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत, याची कल्पना असल्यामुळे नवेगावबांध ग्रामस्थ देखील घराबाहेर पडले नाही.
आठवडी बाजारा निमित्य बाहेरगावच्या व्यापारी ,दुकानदारांनी भाजीपाला, अन्नधान्य विक्री साठी आणले होते. परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आठवडी बाजार आजपासून 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याची कल्पना त्यांना दिल्यामुळे, व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते आल्या पावली परत गेले. त्यामुळे आठवडी बाजारात एकही भाजीपाल्याचे, अन्नधान्याची दुकाने नव्हती. आठवडी बाजारात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. गावातील गल्लीबोळे, मुख्य रस्त्यावर देखील रहदारी दिसून आली नाही. गावातील मुख्य मार्गावरही सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. आजच्या या कडकडीत लॉकडाऊनला गावातील व्यापारी बांधव, ग्रामस्थ, बाहेरगावचे दुकानदार, व्यापारी यांनी आठवडी बाजार बंद ,नवेगावबांध लॉक डाऊनला सहकार्य केल्याबद्दल, नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण, तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.