नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल बाबत त्यांनी सकाळी दहा वाजता ट्विट करून स्वतः माहिती दिली आहेत.
शहरात वेगाने पसरत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शहरातील विविध रुग्णालयास भेट देऊन लसीकरणाची सुविधा, उपलब्ध खाटांची संख्या तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा या सर्व व्यवस्थेची पाहणी केली होती. नागरिकांना कोरोणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे मागील महिनाभरापासून झटत होते. ठीक ठिकाणी पाहणी करून जनजागृती देखील त्यांनी केलेली आहे. अशातच त्यांना कोरोनाची लागण झाली. 13 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाची पहिली लस त्यांनी घेतली होती, हे विशेष.
माझा कोविड -१९ टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे नुकतेच आताच समजले. मागील ४-५ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी दक्षता घ्यावी व आपली कोविड टेस्ट अवश्य करून घ्यावी.
- दयाशंकर तिवारी